आरपीआय च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी निजामकालीन पुरावे सापडले आहेत. राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे केवळ आश्वासन देत आहे. त्यामुळे सध्या आरक्षणासाठी तीव्र आंदोलने सुरु आहेत. मराठा आरक्षणचा मुद्दा न्यायालयात सक्षमपणे मांडणे गरजेचे आहे. खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्या केंद्र शासनामध्ये प्रभावीपणे मांडुन आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आरपीआय मराठा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपोषणाला पाठिंबा दिला.
तसेच राहुरी येथील वकिल संघटनेच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यास विनामुल्य खटला चालवीण्याचे आश्वासन वकिल संघटेच्या वतीने देण्यात आले. तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे मित्र मंडळ व आदिवासी संघटनेच्या वतीने मराठा आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, डाॅ. नारायण माळी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment