३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोमल वाकळेला सुवर्ण तर योगिता खेडकरला कास्यपदक
गौरव डेंगळे (पणजी):गोवा येथे संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत,वेटलिफ्टिंग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी केली. कु. कोमल वाकळे हिने ८७ किलो वजन गटात २०५ किलो वजन उचलून सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर कु. योगिता खेडकर हिने +८७ किलो वजन गटात १९८ किलो वजन उचलून महाराष्ट्र संघास कास्यपदक मिळवून दिले. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ४३ क्रीडाप्रकारात, २८ राज्य, ८ केंद्रशासित प्रदेशतील १० हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे यांनी अभिनंदन केले. त्यांना जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल जिल्ह्यातून खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Post a Comment