Latest Post

श्रीरामपूर : रात्री ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास, श्रीरामपूर बस स्टँड समोरील लोकसेवा हॉटेल बाहेर,अचानक पणे काही युवकांमध्ये दांड्या काठ्या खाली तुंबड हाणामारी सुरू झाल्याने एकाच धावपळ उडाली. ज्यात दत्तनगर येथील सुनील कर्पे व वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथील सतीश धात्रक या दोन्ही युवकांना बेदम मारहाण करण्यात आल्याने, दोन्ही युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना केले. पोलीस घटनास्थळी पोहचले असता.२ युवक जखमी अवस्थेत आढळून आल्याने, पोलिसांनी जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी सतीश धात्रक याची प्रकृती खालवल्याने त्यास पुढील उपचारासाठी प्रवरानगर लोणी येथे हलविण्यात आले असून. सुनील कर्पे यास अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून, २ आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सदरचा वाद हा नेमकी कशामुळे झाला, याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बेलापुर (प्रतिनिधी )- जिद्द ,चिकाटी व प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असेल तर कुठलेही पद मिळवीणे अवघड नाही ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन करत असुन शिवचंद्रपाल जाधव याने मिळवीलेले यश निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी व्यक्त केले                              संक्रांपुर तालुका राहुरी या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवचंद्रपाल बाळासाहेब जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत  घवघवीत यश संपादन करुन कृषी मंडल अधीकारी हे पद मिळविले त्याबद्दल अशोक कानडे व हर्षदादा तनपुरे यांच्या शुभहस्ते संक्रेश्वर मंदिर संक्रांपुर येथे त्याचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प रामदास महाराज दाते हे होते . या वेळी बोलताना हर्षदादा तनपुरे म्हणाले की नवनविन तंत्रज्ञानामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या क्षेत्रात संधी प्राप्त  होत आहे .एका शेतकरी कुटुंबातील मुलगा कृषी अधीकारी झाला याचा अभिमान आहे कारण शेतकऱ्यांच्या व्यथा या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील असलेल्या सदस्यांनाच ठाऊक असतात या वर्षी निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे सर्व पिके डोळ्यादेखत होपळली ,करपली जात आहेत .शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे ,जाधव परिवारातील शिवचंद्रपाल याने जाधव परिवाराबरोबरच गावाचे व तालुक्याचेही नाव उज्वल केले असेही तनपुरे म्हणाले या वेळी कृषी मंडल अधीकारी पद मिळवीलेले शिवचंद्रपाल जाधव व ह भ प रामदास  महाराज दाते यांनीही मनोगत व्यक्त केले  या वेळी शिवचंद्रपाल याचे आई वडील सौ अनिता जाधव व बाळासाहेब जाधव तसेच चुलते नारायण जाधव ,दिलीप जाधव बापुराव जगताप  याचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला .या वेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार संक्रांपुरचे सरपंच रामदास पांढरे ,कुंडलीक खेमनर ,राजीव बोरावके , ऊक्कलगाव सोसायटीचे चेअरमन पुरुषोत्तम थोरात ,धनंजय होन ,जालींदर चव्हाण ,लक्ष्मण  चव्हाण ,रमेश सालबंदे ,पांडूरंग जगताप ,साहेबराव पांढरे ,रोहीदास खपके ,दादा पाटील जगताप ,अर्जुन होन किशोरा वर्पे कामगार तलाठी जालींदर पाखरे ग्रामसेवक तुषार रोहकले आदिसह मान्यवर उपस्थित  होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांनी आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )- जिवन जगताना अध्यात्माची कास धरा अन आनंदी रहा अध्यात्मासारखा आनंद ,सुख, शांती अन तृप्ती कोठेच मिळणार नाही त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावुन दुःख विकत घेवू नका. आनंदी जगा, अन इतरांनाही आनंदी ठेवा. असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला.             जय संतोषी माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता महंत रामगीरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्या वेळी भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हसू हरपले आहे .हसण्याकरीता लोक हास्यक्लब स्थापन करतात हे दुर्दैव आहे भौतिक सुखाचा त्याग करा धर्माची कास धरा आपल्या परंपरा विसरु नका .माता- पित्याची, जेष्ठांची सेवा करा. संत महंतानी सांगीतल्या प्रमाणे आपले आचरण शुद्ध ठेवा .कुणाशीही कपटनिती ठेवुन वागु नका सत्य बोला धर्मानुसार आचरण ठेवा.  जय संतोषी माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजीत पारायण सोहळ्यात सर्वानी भजन किर्तन हरिपाठ याचा आनंद घेतला आहे .आज या साप्ताहाची सांगता आहे .काल्याच्या किर्तनाचा आनंद हा या भूतलावरच घेता येतो त्यामुळे देवादिकांनी देखील अवतार घेवुन काल्याच्या किर्तनाचा लाभ घेतला असल्याचेही महंत रामगीरी महाराज म्हणाले प्रारंभी जय संतोषी मातेच्या प्रतिमेची व ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणूकीत महीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सप्ताह काळात ह भ प संदीप महाराज गुंजाळ तुकाराम महाराज बनकर सचिन महाराज मापारी पांडूरंग महाराज पठारे विजय महाराज गुंजाळ संदीपान महाराज गुंजाळ आदिंनी किर्तनसेवा दिली पारायणाचे नेतृत्व मधुकर महाराज कलगड विजय महाराज गुंजाळ तुकाराम महाराज बनकर संदीप महाराज बनकरव सरला बेटच्या विद्यार्थ्यांंनी केले होते मृदुंगवादक म्हणून सचिन महाराज मापारी चंद्रकांत महाराज डेंगळे किरण महाराज शास्री यांनी काम पाहीले हरिहर भजनी मंडळ विठ्ठल भजनी मंडळ हरिहर महीला भजनी मंडळ सावता भजनी मंडळ आदिसह परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोदविला शेवटी महाप्रसादाने काल्याची सांगता झाली,जय संतोषी माता प्रतिष्ठाण व ठोंबरे परिवाराच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावातील दोन कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून असणारा वाद तंटामूक्त गाव समीतीच्या माध्यमातून मिटविण्यात आला असुन न्यायालयीन लढ्याकरीता होणारा खर्च हा धार्मिक कार्यासाठी  समाजसेवक व धार्मिक कार्यात सतत पुढाकार घेणारे सुवालाल लुक्कड यांच्याकडे मान्यवरांच्या उपस्थितीत सूपुर्त करण्यात आला .                         बेलापुर मळहद येथील राहणारे संजय दत्तात्रय रासकर व सुरेश खंडू भडके या दोन कुटुंबात जागेवरुन वाद होते अनेक वेळा भांडणे हाणामाऱ्या झाल्या वाद पोलीस स्टेशन नंतर  न्यायालयात गेला दोघांनीही वकीलामार्फत लढा सुरु ठेवला .थोड्याशा जागेकरीता जागेच्या किमतीपेक्षा जास्त खर्च होवुन वेळही वाया जातो व शेजारी राहुन कायम संबध खराब होतात याची जाण दोन्ही कुटुंबाला झाली त्यांनी तंटामूक्त समीतीकडे अर्ज केला जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे पत्रकार देविदास देसाई  यांनी दोन्ही कुटुंबासमवेत बैठक घेतली व आपापसातले वाद आपसात मिटविण्यावर रासकर व भडके कुटुंबीयात एकमत झाले .वाद मिटले त्यानंतर दोन्ही कुटुंब आनंदात घरी गेले घरी गेल्यानंतर दोघांनीही विचार केला आपला वेळही वाचला शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडही बसला असता त्यामुळे आपले विनाकारण खर्च होणारे पैसे धार्मिक कार्याकरीता दिले पाहीजे तशी संकल्पना त्यांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना बोलुन दाखवीली त्यानुसार सामाजीक धार्मिक क्षेत्रात अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कंड यांच्याकडे अकरा हजार रुपये सूपुर्त  करण्यात आले या वेळी संजय रासकर  आशोक भडके जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,प्रविण लुक्कड पोलीस पाटील अशोक प्रधान पत्रकार देविदास देसाई  ,सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान एकनाथ उर्फ लहानु नागले  सचिन अमोलीक शफीक आतार आदि उपस्थित  होते

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने हरेगाव उंदीरगाव परिसरातील राहणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती या तरुणांना भेटून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की हरेगांव उंदीरगाव येथे गावातील पाच अल्पवयीन गरीब मुले नावे पुढील प्रमाणे कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणयी खंडागळे यांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून जबर मारहाण करुन त्यांच्या तोंडावर लघवी करुन बुटावर थुंकून त्यांना चाटायला लावले. अमानवीय निर्दयीपणे मारहाण करणारे जातीवादी प्रवृत्तीचे गावगुंड  आरोपी युवराज गलांडे, मनोज बोडखे, आरोपी दुर्गेश वैद्य, राजेंद्र पारखे, दिपक गायकवाड या गावगुंडणी मारहाण करून गंभीर दुखापत केले आहे या गावगुंडांना यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करुन मोका अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक  कोर्टात केस चालवावे तसेच या या गुन्हेगारांचे जामीन न होऊन देता यांची केस अंडरट्रायल चालविण्यात यावे. तसेच आरोपींना प्रोत्साहन देणारा खरा मास्टर माईंड फरार नाना गलांडे ह्याला त्वरीत अटक करण्यात यावे व नाना गलांडे व मुलावर पूर्वी असलेले सर्व  गुन्हयांचा तपास करुन सर्व गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होईल या दिशाने पोलिसांनी पाठपुरावा करावा. तसेच यांचे सावकारकी करुन गोरगरीबांकडून लुबाडण्यात आलेल्या जमीनीच्या चौकशी करुन यांच्या विरोधात सावकारकी करून नागरिकांना लुगडून बेइमानी करून मालमत्ता कमवलेली आहे या सर्व बेमानी संपत्तीची चौकशी करुन त्यांचेवर कठोर कारवाई करावी सावकारीच्या धंद्या मार्फत बळजबरीने दमदाटी करून जादा पैशाची आम्हीच दाखवून व दिशाभूल करून अनेक लोकांचे सह्या घेऊन शेतजमीन, जमीन,घरे, दुकाने  लोकांकडून बळजबरीने कब्जे घेऊन स्वत:च्या नावावर केले आहे. त्याची चौकशी होऊन मुळ मालकाला जमीन, प्लॉट, शेती, फ्लॅट, दुकाने देण्यात यावे. अशा गंभीर गुन्हे करणार्‍या नाना गलांडे व त्यांचा मुलगा व त्याचे साथिदार या सर्वांवर फॉस्टट्रॅक कोर्टात केस चालवावे व अंडरट्रायल  केस चालवुन त्यांना कठोर शिक्षा होईल असे पोलिस प्रशासनाने प्रयत्न करुन समस्याग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे निवेदन देतेवेळी म्हणाले 

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी,तालुका अध्यक्ष डॉ संजय नवथर, शहराध्यक्ष सतिश कुदळे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव गणेश दिवसे,विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश जराड, मनसे तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,तालुक सरचिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा, शहर उपअध्यक्ष विशाल लोंढे, सचिन कदम, मनोहर बागुल,संजय शिंदे,राजू जगताप, नितीन जाधव, मनसे तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे, सुनील करपे, अरमान शेख, विशाल गायकवाड, विद्यार्थी सेना तालुका संघटक नंदू चाबुकस्वार, तालुका सचिव अतुल खरात,तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव, शहर विभाग अध्यक्ष मारुती शिंदे,लखन कुरे,नितीन खरे, लखन कडवे,सुरेश शिंदे, अक्षय काळे,राहुल शिंदे, विकी परदेसी,  संतोष आवटी, करण नांगल किरण, ज्ञानेश्वर काळे, सोनू बोरुडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी  )-गायकवाड वस्ती गोल्डन चारीयट जवळून सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका महीलेने लहान मुलाला पळवुन नेल्याची घटना घडली असुन बेलापुर पोलीसांनी तातडीने सदर महीलेला मुलासह ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते          बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती येथुन सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा नातु परवेज सलीम शेख यास पळवून नेण्यात आले होते सदर महीलेचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर महीलेचा तातडीने शोध घेण्याच्या सुचना बेलापुर पोलीसांना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीसा निरीक्षक जिवन बोरसे बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ संपत बडे भारत तमनर आदिंनी परिसरात शोध घेतला   दोन वर्ष वयाच्या मुलाला पळवुन घेवुन जात असताना देवळाली प्रवरा येथील काही नागरीकांनी त्या महीलेला पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना घटनेची माहीती दिली बेलापुर पोलीस स्टेशनचे काँन्स्टेबल संपत बडे व भारत तमनर तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले तेथुन मुलासह पळवून नेणाऱ्या महीलेस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला  आणले सबंधीत मुलगा परवेज यास आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे दोन वर्ष वयाच्या परवेज शेख यास पळवुन नेणारी महीला खैरुनिसा अकबर शेख ही नाशिक येथील रहीवासी असुन काही वर्षापूर्वी ती गायकवाड वस्ती येथे रहात होती नाशिक येथे तीने विवाह केला होता दहा बारा वर्षानंतर तीने पतीला सोडून दिले गायकवाड वस्ती येथे तीची पहील्या नवऱ्याची मुलगी रहात आहे ती लहान असतानाच ती त्या लहान मुलीला सोडून गेली होती आज ती मुलगी सज्ञान झालेली आहे तिला नेण्यासाठी खैरुनिसा ही गायकवाड वस्ती येथे आली होती परंतु मुलीने येण्यास नकार दिल्यामुळे तिने हे दोन वर्षाचे मुल घेवुन पळ काढला होता परंतु पोलीसांनी ती गायब होण्याच्या आतच मुलासह तीला ताब्यात घेतले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब डोखे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश   अपर आयुक्त नाशिक यांनी रद्द केला असुन या निर्णयामुळे डोखे यांना दिलासा मिळाला आहे .या बाबत सविस्तर माहीती अशी की राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब आण्णासाहेब डोखे यांनी  शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार अनिल भगत यांनी  जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती त्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी राहुरी पंचायत समीतीचे गटविकास अधीकारी यांचे मार्फत चौकशी अहवाल मागवीला होता गटविकास अधीकाऱ्यांनी समक्ष पहाणी करुन ग्रामपंचायत सदस्य गुलाब डोखे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या पूर्व पश्चिम रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आहवाल दिला होता त्या अहवालावरुन तत्कालीन  जिल्हाधिकारी डाँक्टर भोसले यांनी ग्रामपंचायत अधिनियम कलम १९५८ चे कलम १४ ( १ ) ( ज -३ )मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्य अपात्र असलेबाबत निर्णय दिला होता  आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ डोखे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील दाखल केले त्या वेळी युक्तीवाद करताना डोखे यांचे वकील अँड प्रशांत जाधव  यांनी असे म्हणणे मांडले की गटविकास अधीकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात वादग्रस्त जागेचे क्षेत्रफळ नमुद नाही .केसापुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष मोजणी करुन पुर्वीच्या नोंदीत अचूक क्षेत्रफळ नमुद नसल्याने दुरुस्ती केल्याचे स्पष्ट दिसुन येत असल्यामुळे डोखे यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले हे सिध्द होत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( १ ) (ज -३ )मधील तरतुदी विचारात घेवुन अपर आयुक्त निलेश सागर यांनी अपीलार्थी यांचे अपील मान्य करुन जिल्हाधिकारी अहमदनगर यानी दिलेला आदेश रद्द केला त्यामुळे डोखे याचे ग्रामपंचायत सदस्यत्व अबाधीत राहीले आहे .हा निकाल गावात समजताच अनेकांनी फटाके फोडुन आपला आनंद साजरा केला                 वरीष्ठ न्यायालयाने सर्व बाजुंची खातरजमा करुन व पुराव्याचे अवलोकन करुन सत्याला न्याय मिळवून दिला माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकीर्द संपवून मला बदनाम करण्याचा कुटील डाव विरोधकांनी रचला होता पण अखेर सत्याचाच विजय झाला -गुलाब डोखे सदस्य केसापुर ग्रामपंचायत

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget