Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी:मोहर्रम सण उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने तथा शांततेने साजरा व्हावा या करीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये काल दि.१८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. येथील नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्रम उत्सव कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सर्व शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांना मोहर्रम सण साजरा करताना घ्यावयाची काळजी व शहरात जातिय सलोखा कसा अबाधित राहील याकरीता घ्यावयाचा पुढाकार याबरोबरच शहरात भाईचारा आणी शांतता टिकून रहावी याकरीता घ्यावयाची खबरदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शहर व परिसरातील शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रथमता श्रीरामपुरच्या परंपरे प्रमाणे आपल्या विभागाचे नुकतेच पदभार स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना शान ए करबला कमिटी श्रीरामपूर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागतपर सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


या नंतर यंदा होणाऱ्या १९ जुलै ते २९ जुलै मोहरम नियोजन संदर्भात शान ए करबला कमिटी चे अध्यक्ष आसलम बिनसाद यांनी माहिती दिली,यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,शहरात धार्मिक,सांस्कृतिक उत्सव अशी कार्यक्रमे ही झालीच पाहिजे ज्यामुळे सामाजात एकोपा निर्माण होतो, मात्र अशी कार्यक्रम करताना जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्थाही जपली पाहिजे असे ते म्हणाले.श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, मोहर्रम उत्सव कमेटीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांची  सर्वानी पोलिसांना आधीच सूचना द्यावी, दरवर्षी प्रमाणे परवानगी दिली जाईल, कोणीही पुर्व परवानगी न घेता कामे करू नये, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी शान ए करबला कमिटीचे अध्यक्ष आसलम बिनसाद, पदाधिकारी रहेमानअली शाह (बादशहा बाबा),तमन्ना सुरय्या नायक, अजीज अहेमद शेख (भैय्याभाई) सर्व कमिटी सदस्य तसेच शहर हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी आभार मानले.


श्रीरामपुर प्रतिनिधी- वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर उपअभियंता यांना आपले अंतर्गत येणारे श्रीरामपूर शहरातील कॅनॉलमध्ये गोंधवणी रोड राज पेट्रोल पंपाशेजारील कॅनॉल, मिल्लतनगर येथील लोखंडी पुल परिसर, संजयनगर मुळे बंगला कॅनॉल परिसर, खबडी पुल परिसर, नॉर्दर्न ब्रँच परिसर या परिसरातून जाणा-या कॅनॉलमध्ये मोठया प्रमाणात जिवजंतू, म्हशीचे गोठे, तसेच कॅनॉलच्या कडेलाच बनविलेल्या अनाधिकृत कचराकुंडया व या कुंडयांमध्ये म्हशीचे शेण, इतर घाण टाकत असल्याने नागरीकांच्या जिवीताचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या परिसरामधील सर्व लोकांवर कडक कायदेशिर कारवाई करावी  व संपूर्ण परिसरातील कॅनॉलमध्ये असलेली घाण, कचरा याची साफसफाई व्हावी यासाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने मेनरोड महात्मा गांधी पुतळयाजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी माहीत दिली तसेच राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण यांनी देखील आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या उपोषण कर्ते बाळासाहेब बागुल,

हनिफभाई पठाण,रईसभाई शेख,

रज्जाकभाई शेख जर मागण्या वेळीच मान्य नाही केल्यास हे आंदोलन आसेच चालु राहील याची संबंधित खात्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला

पॅरिस १८/७ (गौरव डेंगळे):भारताने डंकर्क,पॅरिस येथे संपन्न झालेल्या FISEC-FICEP गेम्समध्ये मुलींच्या व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच पदक जिंकून इतिहास रचला.१५ जुलै २०२३ हा दिवस भारतीय व्हॉलीबॉलसाठी सुवर्णाचा दिवस असेल.अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात,संघाने उपांत्यपूर्व फेरीत चिलीचा आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रियाचा पराभव केला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लँडर्स संघाकडून १-३ निसटता

पराभव पत्करावा लागला व भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू नंदिनी भागवत,रिया एदलाबादकर,श्रिया गोठोस्कर,अनन्या गोसावी(कर्णधार), तन्वी जोशी, ईरा ढेकणे, समृद्धी कोंढारे, संस्कृती आपटे, अनाहिता मोकाशी,ओजस्वी बचुटे,स्वरा व्यवहारे,वरदा तिलये आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारतासाठी रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती,त्यांनी पहिलाच प्रयत्न देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कुलदीप कोंडे यांनी काम पाहिले तर संघ व्यवस्थापक म्हणून मुग्धा भागवत व श्वेता आपटे यांनी काम पाहिले.रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक श्री अन्वित फाटक,सौ अंचीता भोसले, प्राचार्या सौ राधिका वैद्य, प्रा सचिन घायवळ, क्रीडा प्रमूख श्री रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च दीड ते दोन लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करणे करिता व त्यांना सुविधा पुरविणे करिता आपण वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार करून या कर्तव्य दक्ष अधिकारी यांना यांच्या हक्कांचे लढ्यात सोबत राहून अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 24/7/ 2023 रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह समोर रस्ता रोको आंदोलन करणार व वेळ प्रसंगी संगमनेर व अहमदनगरच्या कार्यालया समोरची आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी दिली आहे

श्रीरामपूर--मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यावर एक सही संतपिती ही मोहीम राबविण्यात आली याच अनुषंगाने श्रीरामपूर गांधी पुतळा येथे बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठे बॅनर लावून एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली या या मोहिमेची सुरुवात दैनिक जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज भाऊ आगे व राष्ट्रीय सह्याद्री चे संपादक करण भाऊ नवले यांच्या सहीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी म्हणजे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही एक सही संतापची ही मोही संपूर्ण राजपूत राज्यभर राबवत आहोत सध्या राज्यात जे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष विरोधी पक्षात देखील आहेत निवडणुकीच्या वेळेस एकमेकावर चिखल करणारे पक्षाचे नेते आमदार खासदार आज सत्तेसाठी सगळेजण शिकलात पडले आहे या लोकांना नागरिकांची मताची किंमत राहिली नाही व यांच्या पक्षाचे ध्येय धोरण विचार याचा सुद्धा विसर पडलेला आहे अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवावे व स्वाभिमानाने व विचारासी तडजोड न करणारे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना मतदार राजाने पाठिंबा देऊन मनसे या पक्षाला भरघोस मताने निवडून द्यावी अशी अहवाल या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे केले 

याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहराध्यक्ष सतीश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष नंदू चाबुकस्वार,शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी,विलास पाटणी,भासकर सरोदे,अंबादास कोकाटे ,विकी राऊत,प्रवीण कारले,सुनील करपे,रामेश्वर कोल्हे, अतुल तारडे विशाल गायकवाड,निलेश सोनवणे,दर्शन शर्मा,संदीप विशंभर,राजू शिंदे ,सचिन कदम,राजू जगताप,ज्ञानेश्वर सोनार,मनोहर बागुल,बबलू बोरकर आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून प्रखर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक २२ व २३जुलै रोजी राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी 

प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,

द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,

  तृतीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच

उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/रुपयाचे दोन पारितोषिक.

असे बक्षिसाचे स्वरूप राहील.

ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी आपल्या शाळेमार्फत खाली दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.

टीप -सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

संपर्क-श्री तुरकणे सर (९९२२३०१६६८)

श्री नन्नवरे सर (७०६६६०३३३३)

 सौ.होन मॅडम (७५५८४७९९६०)

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील जवान सुजित श्रीकांत शेलार हा मातृभूमीची सेवा करुन सेवानिवृत्त होवुन गावी परतला त्या वेळी गावाकऱ्यांनी श्रीरामपुर रेल्वे स्थानकापासून ते बेलापुर पर्यत उघड्या जीपमधुन मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला                                                  येथील सौ शकुंतला व श्रीकांत शेलार यांचे चिरंजीव सुजित हे १५ आँगस्ट २००१ साली नाशिक येथे सी आर पी एफ मध्ये भरती झाले होते श्रीनगर जम्मू येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती  आसाम येथे झाली .त्यांनी शिलाँग अरुणाचल या ठिकाणी सेवा केली सन २००५ ते २००८ या कालावधीत श्रीनगर येथे ड्यूटी केली सन२००८ ते २०११ या कालावधीत नवि दिल्ली येथे विविध महत्वाच्या जागेवर गर्द ड्यूटी केली सन २०११ मध्ये त्यांची बदली ९९ बटालीयन रँपिड अँक्शन फोर्स येथे झाली त्या वेळी तेलंगाना वेगळे होण्याचा विषय सुरु होता त्या वेळी दंगल सदृश्य अनेक भागात सेवा करण्याची संधी मिळाली .सन २०१५ ते २०१८ या काळात नक्शलप्रभावी क्षेत्र छत्तीसगढ येथेही सेवा करण्याची संधी मिळाली या भागात तर जिव मुठीत धरुनच काम करावे लागत होते त्या ही परिस्थितीत मेजर सुजीत शेलार यांनी अनेक ठिकाणी फिरुन नक्शली कारवाया हाणून पाडल्या .सन २०१८ ते २०२३ या कालावधीत जम्मु येथे सेवा देवुन शिपाई पदावर भरती झालेले मेजर सुजीत शेलार हे हवालदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले सन २००१ ते सन २०२३ या कालावधीत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.काही प्रसंग तर जिवावर बेतले होते त्या ही परिस्थितीत त्यांनी देशाची सेवा करुन नक्शलवाद्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला या काळात अनेक सन्मानही त्यांना मिळाले असा हा जवान सीआरपीएफची सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त होवुन घरी परतला त्यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले फटक्याची अतिषबाजी करुन उघड्या जीपमधुन त्यांची मिरवणूक काढली जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजारा सामितीचे सभापती सुधीर नवले दत्ता कुर्हे   अरुण पा नाईक विलास मेहेत्रेशिवाजी वाबळे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले भास्कर बंगाळ वैभव कुऱ्हे सुनिल कुर्हे साहेबराव क्षिरसागर मेजर किरण शेलार प्रकाश कुमावत भगीरथ मुंडलीक पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार बंटी शेलार विजय शेलार स्वप्निल मुंडलीक संजय शेलार बाबा शेलार आंदींनी मेजर सुजित यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget