श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे
वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे
साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च दीड ते दोन लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करणे करिता व त्यांना सुविधा पुरविणे करिता आपण वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार करून या कर्तव्य दक्ष अधिकारी यांना यांच्या हक्कांचे लढ्यात सोबत राहून अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 24/7/ 2023 रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह समोर रस्ता रोको आंदोलन करणार व वेळ प्रसंगी संगमनेर व अहमदनगरच्या कार्यालया समोरची आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी दिली आहे
Post a Comment
ok