अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लँडर्स संघाकडून १-३ निसटता
पराभव पत्करावा लागला व भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू नंदिनी भागवत,रिया एदलाबादकर,श्रिया गोठोस्कर,अनन्या गोसावी(कर्णधार), तन्वी जोशी, ईरा ढेकणे, समृद्धी कोंढारे, संस्कृती आपटे, अनाहिता मोकाशी,ओजस्वी बचुटे,स्वरा व्यवहारे,वरदा तिलये आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारतासाठी रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती,त्यांनी पहिलाच प्रयत्न देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कुलदीप कोंडे यांनी काम पाहिले तर संघ व्यवस्थापक म्हणून मुग्धा भागवत व श्वेता आपटे यांनी काम पाहिले.रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक श्री अन्वित फाटक,सौ अंचीता भोसले, प्राचार्या सौ राधिका वैद्य, प्रा सचिन घायवळ, क्रीडा प्रमूख श्री रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment