श्रीरामपुर प्रतिनिधी- वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर उपअभियंता यांना आपले अंतर्गत येणारे श्रीरामपूर शहरातील कॅनॉलमध्ये गोंधवणी रोड राज पेट्रोल पंपाशेजारील कॅनॉल, मिल्लतनगर येथील लोखंडी पुल परिसर, संजयनगर मुळे बंगला कॅनॉल परिसर, खबडी पुल परिसर, नॉर्दर्न ब्रँच परिसर या परिसरातून जाणा-या कॅनॉलमध्ये मोठया प्रमाणात जिवजंतू, म्हशीचे गोठे, तसेच कॅनॉलच्या कडेलाच बनविलेल्या अनाधिकृत कचराकुंडया व या कुंडयांमध्ये म्हशीचे शेण, इतर घाण टाकत असल्याने नागरीकांच्या जिवीताचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या परिसरामधील सर्व लोकांवर कडक कायदेशिर कारवाई करावी व संपूर्ण परिसरातील कॅनॉलमध्ये असलेली घाण, कचरा याची साफसफाई व्हावी यासाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने मेनरोड महात्मा गांधी पुतळयाजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी माहीत दिली तसेच राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण यांनी देखील आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या उपोषण कर्ते बाळासाहेब बागुल,
हनिफभाई पठाण,रईसभाई शेख,
रज्जाकभाई शेख जर मागण्या वेळीच मान्य नाही केल्यास हे आंदोलन आसेच चालु राहील याची संबंधित खात्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला
Post a Comment