या नंतर यंदा होणाऱ्या १९ जुलै ते २९ जुलै मोहरम नियोजन संदर्भात शान ए करबला कमिटी चे अध्यक्ष आसलम बिनसाद यांनी माहिती दिली,यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,शहरात धार्मिक,सांस्कृतिक उत्सव अशी कार्यक्रमे ही झालीच पाहिजे ज्यामुळे सामाजात एकोपा निर्माण होतो, मात्र अशी कार्यक्रम करताना जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्थाही जपली पाहिजे असे ते म्हणाले.श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, मोहर्रम उत्सव कमेटीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांची सर्वानी पोलिसांना आधीच सूचना द्यावी, दरवर्षी प्रमाणे परवानगी दिली जाईल, कोणीही पुर्व परवानगी न घेता कामे करू नये, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी शान ए करबला कमिटीचे अध्यक्ष आसलम बिनसाद, पदाधिकारी रहेमानअली शाह (बादशहा बाबा),तमन्ना सुरय्या नायक, अजीज अहेमद शेख (भैय्याभाई) सर्व कमिटी सदस्य तसेच शहर हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी आभार मानले.
मोहर्रम सणच्या निमित्ताने डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशन मध्ये बैठक संपन्न.
श्रीरामपूर प्रतिनिधी:मोहर्रम सण उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने तथा शांततेने साजरा व्हावा या करीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये काल दि.१८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. येथील नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्रम उत्सव कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सर्व शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांना मोहर्रम सण साजरा करताना घ्यावयाची काळजी व शहरात जातिय सलोखा कसा अबाधित राहील याकरीता घ्यावयाचा पुढाकार याबरोबरच शहरात भाईचारा आणी शांतता टिकून रहावी याकरीता घ्यावयाची खबरदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शहर व परिसरातील शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रथमता श्रीरामपुरच्या परंपरे प्रमाणे आपल्या विभागाचे नुकतेच पदभार स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना शान ए करबला कमिटी श्रीरामपूर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागतपर सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Post a Comment