सेवानिवृत्त जवानांची बेलापुर ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील जवान सुजित श्रीकांत शेलार हा मातृभूमीची सेवा करुन सेवानिवृत्त होवुन गावी परतला त्या वेळी गावाकऱ्यांनी श्रीरामपुर रेल्वे स्थानकापासून ते बेलापुर पर्यत उघड्या जीपमधुन मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला येथील सौ शकुंतला व श्रीकांत शेलार यांचे चिरंजीव सुजित हे १५ आँगस्ट २००१ साली नाशिक येथे सी आर पी एफ मध्ये भरती झाले होते श्रीनगर जम्मू येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती आसाम येथे झाली .त्यांनी शिलाँग अरुणाचल या ठिकाणी सेवा केली सन २००५ ते २००८ या कालावधीत श्रीनगर येथे ड्यूटी केली सन२००८ ते २०११ या कालावधीत नवि दिल्ली येथे विविध महत्वाच्या जागेवर गर्द ड्यूटी केली सन २०११ मध्ये त्यांची बदली ९९ बटालीयन रँपिड अँक्शन फोर्स येथे झाली त्या वेळी तेलंगाना वेगळे होण्याचा विषय सुरु होता त्या वेळी दंगल सदृश्य अनेक भागात सेवा करण्याची संधी मिळाली .सन २०१५ ते २०१८ या काळात नक्शलप्रभावी क्षेत्र छत्तीसगढ येथेही सेवा करण्याची संधी मिळाली या भागात तर जिव मुठीत धरुनच काम करावे लागत होते त्या ही परिस्थितीत मेजर सुजीत शेलार यांनी अनेक ठिकाणी फिरुन नक्शली कारवाया हाणून पाडल्या .सन २०१८ ते २०२३ या कालावधीत जम्मु येथे सेवा देवुन शिपाई पदावर भरती झालेले मेजर सुजीत शेलार हे हवालदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले सन २००१ ते सन २०२३ या कालावधीत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.काही प्रसंग तर जिवावर बेतले होते त्या ही परिस्थितीत त्यांनी देशाची सेवा करुन नक्शलवाद्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला या काळात अनेक सन्मानही त्यांना मिळाले असा हा जवान सीआरपीएफची सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त होवुन घरी परतला त्यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले फटक्याची अतिषबाजी करुन उघड्या जीपमधुन त्यांची मिरवणूक काढली जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजारा सामितीचे सभापती सुधीर नवले दत्ता कुर्हे अरुण पा नाईक विलास मेहेत्रेशिवाजी वाबळे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले भास्कर बंगाळ वैभव कुऱ्हे सुनिल कुर्हे साहेबराव क्षिरसागर मेजर किरण शेलार प्रकाश कुमावत भगीरथ मुंडलीक पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार बंटी शेलार विजय शेलार स्वप्निल मुंडलीक संजय शेलार बाबा शेलार आंदींनी मेजर सुजित यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले
Post a Comment