उर्दू माध्यमातुन अंगणवाडी सुरु करावी -मुस्लिम समाजाची मागणी
बेलापुर (प्रतिनिधी )-येथे उर्दू माध्यमातून इयत्ता पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जात असुन उर्दू माध्यमाची अंगणवाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली आहे या बाबत मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापुर गावात पाच दे सात हजार मुस्लिम बांधव रहात असुन येथे मुलांना उर्दू माध्यमातून शिक्षण घेता यावे या करीता इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचे वर्ग आहे मात्र मराठी माध्यमातून अंगणवाडीत शिक्षण घेतलेल्या मुलांना इयत्ता पहीलीचे उर्दू माध्यमाचे शिक्षण अतिशय अवघड वाटते त्यामुळे मुलांना अंगणवाडीतुनच उर्दू माध्यमाचे शिक्षण मिळाल्यास त्यांची अधिक प्रगती होईल त्या करीता बेलापुर येथे जागा देखील उपलब्ध आहे तसेच मुलांना शिकविण्यासाठी उर्दू माध्यमाची शिक्षीका देखील आहे तरी शासनाने आमच्या योग्य मागणीची योग्य ती दखल घेवुन तातडीने अंगणवाडी सुरु करण्यास परवानगी द्यावी आशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर सर्वश्री आसीफ शेख ,शफिक आत्तार ,मोहसीन सय्यद ,अजिज शेख उर्फभैय्या ,जब्बार आतार , शफीकं बागवान ,हाजी ईस्मईल शेख ,समिर जहागीरदार सर्फराज सय्यद मुश्ताक आतार ,जावेद पिंजारी ,फिरोज कुरेशी ,रियाज तांबोळी ,इरफान पठाण ,अकिल पटेल जब्बार वाघवाले ,बाबा सय्यद आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment