वनविभाग हरित सेना यांच्या सहकार्याने विद्यालयात गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो, संत तेरेजा मुलींच्या विद्यालयाची यासाठी वनविभागाकडून निवड करण्यात आली आहे वनविभागाचे वनरक्षक श्री के निर्वाण, श्री जाधव व श्री आहेर व श्री कानडे याप्रसंगी उपस्थित होते.जागतिक तापमान वाढ, पावसाचे घटत असलेले प्रमाण, वाढते प्रदूषण या समस्यांसाठी "झाडे लावणे" अत्यंत महत्त्वाचे असून वसुंधरा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी मानवाची भूमिका व जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. "झाडे लावा व निसर्गाचा समतोल" सांभाळा असा संदेश श्री जाधव साहेब यांनी याप्रसंगी मुलींना दिला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सिस्टर ज्योती सर्व शिक्षक व विद्यार्थिनी यांनी रोपे हाती घेऊन घोष फलकासह ग्रामस्थांना वृक्ष लागवडीसाठी प्रेरणा दिली. अतिशय उत्साहात घोषणा देत वृक्ष दिंडी काढून जनजागृती केली. "पर्यावरण सांभाळा झाडे लावा" असा संदेश दिला. याप्रसंगी पालकांना रोपे वाटप करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मुलींना सुमारे पाचशे रोपांचे वितरण करण्यात आले. हरित सेनेचे ववनाधिकारी, माननीय मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती व विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत मुलींनी दिंडीत सहभागी होत आपले वृक्ष प्रेम घोषणा देत व्यक्त केले व आपल्याला मिळालेले रोप वाढविण्याची जबाबदारी घेतली. या वृक्षदिंडीचे व वृक्षारोपण समारंभाचे प्रास्तविक श्री सुहास ब्राह्मणे यांनी केले, व विद्यालयाच्या वतीने माननीय वनाधिकाऱ्यांचा सत्कार श्री आदिनाथ आघाव यांनी केला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला झाला.
संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल मध्ये वृक्षारोपण व वृक्षदिंडी द्वारे जनजागृती
हरेगाव : दि. ८ जुलै २०२३ रोजी संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल येथे वृक्षदिंडी वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.
Post a Comment