Latest Post

दिनांक 9 जून रोजी 10 ते 5 वा.चे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरातुन फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हिला कशाचेतरी आमिष दाखवुन फिर्यादीचे संमतीशिवाय पळवुन घेवुन गेला म्हणुन फिर्यादीचे तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशने येथे गुरनं. 552/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथकास आदेश दिले, त्यानुसार तपास पथकाने तात्काळ आरोपीचा व अल्पवयीन मुलीचा शोध चालु केला, मोबाईल ट्रॅकीग, सी. डी. आर. / एस. डी. आर. रिपोर्ट तसेच फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातुन शोध चालु केला. पोलीस आपल्या मागावर आहेत यांची भनक आरोपीस लागल्याने सदर अल्पवयीन मुलीस दिनांक 10/06/2023 रोजी सांयकाळी 06/00 वा. सुमा. राहुरी फॅक्ट्ररी येथे सोडुन निघुन गेला होता. सदर अल्पवयीन मुलीस विश्वासात घेवुन विचारपुर केली असता तिच्या शाळेचा बस चालक आरोपी नामे विजय गोविंद गोडसे, रा. देवळाली ता. राहुरी जि. अहमदनगर यांने माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे आई वडील तुला नेहमी त्रास देतात, ते मला पाहवत नाही, आपण त्याच्यापासुन लांब कुठेतरी निघुन जावु, असे बोलुन मला माझे राहते घरुन घेवुन गेला व मी अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुध्दा त्याने माझ्यावर लैगिक अत्याचार केला असा जबाब मुलीने दिल्याने सदर दाखल गुन्हयात भांदवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6, 11, 12 प्रमाणे वाढ करुन आरोपीचा शोधाकरीता दोन वेगवेगळया टिम करुन शोध चालु केला.दिनांक 16/06/2023 रोजी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांना सदर गुन्हयातील आरोपी हा रात्री 09/00 वा. सुमारास राहुरी फॅक्ट्ररी परीसरात येणार असल्याची गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोनि. गवळी साो. यांचे आदेशाने सदर परिसरात तपास पथकाने सापळा रचुन शिताफीने सदर आरोपीस ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहर पोलीसांकडुन पोक्सो कायदयाबाबत जनजागृतीसाठी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, 18 वर्षे पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, प्रत्यक्ष वा सोशल मिडीयावरुन पाठलाग केल्यास प्रेमाच्या जाळयात ओढल्यास, पळवून नेल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांना असे कृत्य करण्यास मदत करणाऱ्या व्यक्ती विरुध्द तात्काळ पोक्सो कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येते.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे, स.फौ. सुधिर हापसे, पोना / रघुवीर कारखेले, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ गणेश गावडे, पोकॉ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/ भारत तमनर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोना. सचिन धनाड, पोकॉ. / प्रमोद जाधव व पोकॉ. आकाश भैरट यांनी केली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन बोरसे हे करीत आहेत.


बेलापुर (प्रतिनिधी  )-भारतीयांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.असे असले तरी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे पऱ्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा अन ती जगवा असा संदेश श्रीरामपूरचे वरिष्ठ वनपरिमंडळ अधिकारी एम डी कोळी यांनी केले. श्रीरामपुर  तालुक्यातील उक्कलगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .त्या वेळी कोळी यांनी हे अवाहन केले   या वेळी प्रवरा नदीकाठी दशक्रियविधी ओठयाजवळ कांचन वड करंजी लिंब शिवण 

आदी प्रकारच्या अकरा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.उक्कलगाव गळनिंब रस्त्यावर वनविभागाच्या वतीने झाडे लावण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाचे दिपक निर्वाण ग्रामरोजगार सेवक शाम नागरे यांनी  त्या झाडांची योग्य निगा व काळजी घेतल्यामुळे आज रस्त्याच्या दुतर्फा चांगल्या प्रकारे झाडांची वाढ झालेली दिसत असल्याचे पत्रकार देविदास देसाई यांनी सांगुन दोघांचेही अभिनंदन केले  यावेळी श्रीरामपूर वनपरिमंडळ अधिकारी संगिता चौरे सामजिक वनीकरण अधिकारी  दिपक निर्वाण वनीकरण कर्मचारी बाळासाहेब कांबळे विशाल कानडे बाळासाहेब आहेर प्रशासक दिपक मेहेरे ग्रामविकास अधिकारी रमेश निबे ग्रामरोजगार सेवक शाम नागरे अनिल थोरात सोमनाथ मोरे पोलिस पाटील हिराबाई मोरे विकास थोरात दिगबर मोरे नानासाहेब थोरात वनमजूर संजय गायकवाड बबन पिसाळ रामभाऊ मोरे किशोर थोरात रविंद्र मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

......

बेलापूरः (प्रतिनिधी  )-छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन रयतेचे राज्य साकारले.सामान्य माणूस व स्वराज्यातील गाव हे केन्द्रस्थानी माणून त्यांनी राज्यकारभार केला.शिवराय हे ख-या अर्थाने ग्रामविकासाचे प्रवर्तक होते असे प्रतिपादन जि.परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                                            बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले यांनी मनोगत व्यक्त केले.                        प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.यावेळी सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्रामविकास अधिकारी श्री.गायकवाड  यांचेसह  भास्कर बंगाळ,प्रकाश कु-हे ,प्रभात कु-हे ,महेश कु-हे ,दादासाहेब कुताळ,पञकार सुहास शेलार,प्रविण बाठीया,जनार्दन ओहोळ,प्रभाकर ताके,सुभाष  राशिनकर,अली शेख,बाबुराव पवार,सचिन साळुंके,विजय खरोटे आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिद्द चिकाटी व  कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हेच अभिषेक दुधाळ याने दाखवुन दिले असुन आजच्या तरुणासमोर अभिषेक एक आदर्श असल्याचे मत उपविभागीय अधिकारी किरण सांवत पाटील यांनी व्यक्त केले बेलापुर येथील अभिषेक दुधाळ याने युपीएससी परिक्षेत सलग तिन वेळेस घवघवीत यश मिळवीले नुकत्याच झालेल्या परिक्षेत त्याने देशात२७८ वी रँक मिळवीली त्याबद्दल श्रीरामपुर महसुल विभागाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते उपविभागीय अधीकारी किरण सावंत पुढे म्हणाले की तरुणांनी आगोदर आपले ध्येय निश्चित करावे व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी अनेक जण प्रयत्न न करता नशिबाला दोष देतात परंतु प्रयत्नवादी रहा यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक दुधाळ असल्याचेही सावंत पाटील म्हणाले या वेळी प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनीही अभिषेक दुधाळ याचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना अभिषेक दुधाळ याने मी घेतलेले कष्ट व त्याला मिळालेले आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार या सर्वांचे आशिर्वाद व प्रेम  यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले या वेळी योगेश भालेकर रामेश्वर शेले सावळे भाऊसाहेब सय्यद भाऊसाहेब धनवटे भाऊसाहेब अभया राजळव शारदा वाघ मिलींद दुधाळ पत्रकार देविदास देसाई आदि  मान्यवर उपस्थित होते

श्रीरामपूर :-येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपली १००% टक्के निकालाची परंपरा यंदा सलग १८ व्या वर्षीही कायम राखली.यावर्षी शाळेतून एकूण ६३ विद्यार्थी बसले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले.धनश्री चौधरी ही विद्यार्थिनी ९०.४०%  टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली. विभूती गुप्ता व मल्हार पवार दोघांनीही ९०.२०% टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋषिता सोनत्तके ८९.८० % गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, खजिनदार जन्मजय टेकावडे, सदस्य सुरेश ओझा, विधीज्ञ दादासाहेब औताडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा.

बेलापूरःबेलापूरबु-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या १२६ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन विनामुल्य देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला.सदरची जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूर बु-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.                            बेलापूर-ऐनतपूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी मंञीमंडळाच्या बैठकीत शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्याचा निर्णय झाला होता.यासाठी जमिनीच्या  किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३० लाख रुपये इतके जमिनीचे मुल्यांकन ठारविण्यात आले होते.तथापि महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी सदरची जमीन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी द्यायची असून लोकहिताच्या कामासाठी देणार असल्याने  सदरची जमिन विनामुल्य देणेबाबत आग्रही मागणी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळ बैठकीत केली.सदरची विनंती मान्य करुन सदर जमिन विनामुल्य देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यामुळे ग्रापंचायतीला भरावे लागणारे ३० लाख रुपये वाचले आहेत.                   सदर जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,भाजपा  सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानू नागले,अँड.अरविंद साळवी,पत्रकार दिलीप दायमा,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,मोहसीन सय्यद,भाऊसाहेब तेलोरे,महेश कुऱ्हे,प्रशांत मुंडलिक,बाबुलाल पठाण,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ,शशिकांत तेलोरे,सुनिल शहाणे,मास्तर हुडे,टिंकू राकेचा,राम कुऱ्हे,प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित होते.

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गतच्या १२६ कोटी रुपये खर्चाच्या  पाणीपुरवठा  योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्यास महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नाने व जि.प.सदस्य शरद नवले यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य मंञी मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.                              बेलापूर-ऐनतपूरची १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.या योजनेसाठीच्या साठवण तलावासाठी जागा नव्हती.त्यामुळे सध्याच्या साठवण तलावांच्या लगतचीच शेती महामंडळाची जमिन मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.तसेच यासाठी महसूल मंञी नामा.राधाकृष्ण विखे पा.यांचे माध्यमातून  जि.प. सदस्य शरद नवले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनिल हरदास यांनी सकारात्मक पाठपुरवठा केला होता.अखेर या प्रयत्नास यश येवून राज्य मंञी मंडळाने साठवण तलावासाठी शेती महामंडळाची सुमारे चार कोटी  किमतीची साडे आठ एकर जमिन अंदाजे ३०लाख किमतीत देण्यास मंजुरी दिली.                             सदर साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने गावक-यांना १००दिवस पुरेल एवढ्या क्षमतेच्या सिमेंट काँक्रेटच्या साठवण तलावाची स्वप्नपूर्ती होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाला धन्यवाद दिले.सदरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंञी नाम.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी नाम.देवेन्द्र फडणवीस,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे,पाणी पुरवठा मंञी नाम.गुलाबराव पाटील,खासदार सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदिंसह महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे  उपअभियता भिमगिरी कांबळे,शाखा अभियंता सुनील हरदास तसेच शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद  दिले आहेत.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जालिंदर कुऱ्हे,रणजीत श्रीगोड, मारुतीराव राशिनकर, देविदास देसाई, भाऊसाहेब कुताळ,ग्रा.प.सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, सचिन अमोलिक, अरविंद साळवी,भरत साळुंके, रविंद्र खटोड, प्रफुल्ल डावरे, लहानू नागले,बाळासाहेब दाणी,रावसाहेब अमोलिक,पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब तेलोरे,प्रल्हाद अमोलिक,भैय्या शेख,शफिक आतार, जनार्दन ओहोळ, सचिन वाघ, विशाल आंबेकर, अमोल गाढे, किशोर महापुरे, गणेश मगर,मास्टर हुडे, प्रशांत मुंडलिक,गोपी दाणी,प्रशांत लढ्ढा, सद्दाम शेख, जिना शेख, दादासाहेब कुताळ,सागर ढवळे, बाबुराव पवार,शरद अंबादास नवले, दिलीप अमोलिक, किरण गागरे, विजय अमोलिक,लक्ष्मण रशिनकर,अन्सार पटेल,राजेंद्र फुंदे,बबन मेहेत्रे,प्रविण बाठीया, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget