छ.शिवजी महाराज हे ग्रामविकासाचे प्रवर्तकःशरद नवले
बेलापूरः (प्रतिनिधी )-छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन रयतेचे राज्य साकारले.सामान्य माणूस व स्वराज्यातील गाव हे केन्द्रस्थानी माणून त्यांनी राज्यकारभार केला.शिवराय हे ख-या अर्थाने ग्रामविकासाचे प्रवर्तक होते असे प्रतिपादन जि.परिषद सदस्य शरद नवले यांनी केले. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.यावेळी सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्रामविकास अधिकारी श्री.गायकवाड यांचेसह भास्कर बंगाळ,प्रकाश कु-हे ,प्रभात कु-हे ,महेश कु-हे ,दादासाहेब कुताळ,पञकार सुहास शेलार,प्रविण बाठीया,जनार्दन ओहोळ,प्रभाकर ताके,सुभाष राशिनकर,अली शेख,बाबुराव पवार,सचिन साळुंके,विजय खरोटे आदी उपस्थित होते.
Post a Comment