मागील १८ वर्षापासून १००% निकालाची न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजची परंपरा कायम.धनश्री चौधरी ९०.४० % गुण मिळून प्रथम.
श्रीरामपूर :-येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपली १००% टक्के निकालाची परंपरा यंदा सलग १८ व्या वर्षीही कायम राखली.यावर्षी शाळेतून एकूण ६३ विद्यार्थी बसले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले.धनश्री चौधरी ही विद्यार्थिनी ९०.४०% टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली. विभूती गुप्ता व मल्हार पवार दोघांनीही ९०.२०% टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋषिता सोनत्तके ८९.८० % गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, खजिनदार जन्मजय टेकावडे, सदस्य सुरेश ओझा, विधीज्ञ दादासाहेब औताडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा.
Post a Comment