बेलापूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावास विनामुल्य जमिन मिळवून दिल्याबद्दल नामदार विखे पाटील यांचा सत्कार
बेलापूरःबेलापूरबु-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या १२६ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन विनामुल्य देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला.सदरची जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूर बु-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला. बेलापूर-ऐनतपूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी मंञीमंडळाच्या बैठकीत शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्याचा निर्णय झाला होता.यासाठी जमिनीच्या किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३० लाख रुपये इतके जमिनीचे मुल्यांकन ठारविण्यात आले होते.तथापि महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी सदरची जमीन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी द्यायची असून लोकहिताच्या कामासाठी देणार असल्याने सदरची जमिन विनामुल्य देणेबाबत आग्रही मागणी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळ बैठकीत केली.सदरची विनंती मान्य करुन सदर जमिन विनामुल्य देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यामुळे ग्रापंचायतीला भरावे लागणारे ३० लाख रुपये वाचले आहेत. सदर जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानू नागले,अँड.अरविंद साळवी,पत्रकार दिलीप दायमा,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,मोहसीन सय्यद,भाऊसाहेब तेलोरे,महेश कुऱ्हे,प्रशांत मुंडलिक,बाबुलाल पठाण,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ,शशिकांत तेलोरे,सुनिल शहाणे,मास्तर हुडे,टिंकू राकेचा,राम कुऱ्हे,प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित होते.
Post a Comment