Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या अधिपत्याखाली  बांधकाम अभियंता व मर्जीतील ठेकेदार यांना कामे वाटप केले व अर्थिक संगणमत करून सन २०२१-२०२२  मध्ये पूर्ण केलेल्या व चालू असलेल्या  ,व गेली आठ दिवसात पूर्ण झालेल्या विविध रस्त्यांच्या विकास कामामध्ये केलेली कार्यालय अनियमितता गैरप्रकार व झालेले चालू असलेले रस्ते निकृष्ट थातूरमातूर कामे करून टक्केवारी घेऊन बिले  काढले व झालेल्या सर्व कामे थातूर-मातूर  निकृष्ट  खडी व अल्प प्रमाणात डांबर  वापरून शहरातील अनेक रस्त्यांची कामे केली  सदरील उपोषण अर्जात नमूद कामाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही  करण्याच्या  मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने  नगरपरिषद श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास दि.२७/१२/०२२ रोजी सुरुवात झाली आहे.

      वरील अर्जात नमूद कालावधीमधील झालेल्या व चालू असलेल्या व दहा बारा दिवसांमध्ये गेल्या  नामदार विखेंच्या हातसे उद्घाटन झालेल्या व केलेल्या कामांची सखोल चौकशी होऊन संबंधित  व कामावर वापरलेल्या मटेरियल ची उच्चस्तरीय सूक्ष्म चौकशी करून  कार्यवाही साठी व संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी व काम करणारे निकृष्ट थातूरमातूर काम करणारे ठेकेदार  यांना  काळया यादीत टाकावे व त्यांनी केलेले काम व कामापोटी काढलेल्या व काढण्याच्या तयारीत असलेली सर्व बिले तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयासमोर भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव   हनिफ भाई पठाण, जिल्हाध्यक्ष -रज्जाक भाई शेख ,जिल्हा संघटक- राजेंद्र त्रिभुवन  आदी  लहुजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणास बसले आहे.

श्रीरामपूर : गावं तसं चांगलं पण काही लोकांमुळे भंगल,अशी परिस्थिती,तालुक्यातील एकलहारे ग्रामपंचायतीची झाली आहे. याठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराने, येथील नागरिकांसाठी आलेले स्वस्त धान्य, काळ्या बाजारात विक्रीस पाठवत असतांना. गावातील काही महिलांनी, टेम्पो आडवून. रेशनचा गहू तांदूळ कुठं चालवले याची विचारपूस केली. मात्र रेशनदुकानदार एस के मस्के यांच्या नावावर असलेल्या,स्वस्त धान्य दुकान चालकाने अरेरावी करत. रेशनचे धान्याने भरलेला टेम्पो काढुन दिला. यासंदर्भात ग्रामस्थांनी  तक्रार केल्याने, ग्रामसेवक,तलाठी,सरपंच व ५ पंचांसह, सायंकाळी ५ : ३० वाजेच्या सुमारास, रेशनचे धान्य दुकान सील केले. कारवाईच्या भीतीपोटी रेशन दुकान चालकाने, काळ्या बाजारात पाठवलेले गहू तांदूळ,बारदाने बदललेल्या अवस्थेत,   अधिकाऱ्यांनी सील केलेलं कुलूप उघडून, काळ्या बाजारात नेलेले गहू तांदूळ परत आणले. मात्र ग्रामस्थानी त्यास विरोध करून. पुरवठा अधिकारी व तलाठी यांना बोलावून, रेशन दुकानाचा पंचनामा करून. संबंधित रेशन दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल केला असून. गरिबांच्या तोंडचे अन्न चोरून नेणाऱ्या, स्वस्त धान्य दुकान चालक राहुल पगारे याच्या विरुद्ध,कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. स्वस्त धान्य घोटाळ्या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात, पुरवठा निरीक्षक

सुहास पुजारी यांच्या फिर्यादीवरून, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे  कलम ३ ,७ अन्वये स्वस्त धान्य दुकान चालक शांताबाई कारभारी म्हस्के - पगारे हिच्या विरुद्ध, गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलीस कारवाईत, स्वस्त धान्याने भरलेल्या १५ पोती ताब्यात घेण्यात आली असून. या प्रकरणाचा पुढील तपास,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस नाईक गणेश भिंगारदे हे करीत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - श्रीरामपूर तालुक्याला मराठवाड्याशी जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे श्रीरामपूर - वैजापूर हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सध्या ३० किलोमीटर अंतरासाठी सव्वा ते दीड तासाचा वेळ लागत आहे. 20 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने कोणती ही गाडी येथे चालवता येत नाही. केवळ लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम दोन्ही भागातील जनतेला भोगावे लागत आहेत. त्यामुळे श्रीरामपूर- वैजापूर या रस्त्याच्या कामामध्ये लक्ष घालून सदरचा रस्त्याचे मजबुतीकरण करून हा रस्ता चौपदरी करण्यात यावा यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडून खास निधी या ३० किलोमीटरसाठी उपलब्ध करून घ्यावा आणि वर्षानुवर्ष हाल अपेक्षा भोगणाऱ्या जनतेची सुटका करावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील त्रस्त जनतेने खासदार सदाशिव लोखंडे यांना केली आहे.

श्रीरामपूर - वैजापूर रस्त्याचे एकूण अंतर ३८ किलोमीटर आहे. यापैकी श्रीरामपूर ते खैरी निमगाव पर्यंतचा आठ किमी पर्येंत चा रस्ता अत्यंत चांगला आहे. तिथून पुढे नाऊर पर्यंतचा रस्ता खूपच खराब आहे. या रस्त्यावर इच्छा असूनही वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवता येत नाही. सिंगल रोड असल्याने प्रवासाला वेळ लागतो. तिथून पुढे वैजापूर तालुक्यात लाडगाव पासून पुढे रोड चांगला आहे. मधला रस्ता थोडा खराब आहे. परंतु सिंगल रोड असल्याने इथे सुद्धा तीस किलोमीटर साठी सव्वा ते दीड तास वेळ द्यावा लागतो. त्यातच सध्या उसाच्या गाड्या चालू असल्याने रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या रस्त्याबाबत दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सोयीनुसार आत्तापर्यंत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला खिळ बसली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा रस्ता सोयीस्कर आहे.परंतु खैरी निमगाव ते  नाऊरपर्यंत हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे.

 वैजापूर तालुक्यातील जनतेचे श्रीरामपूरशी खूप जवळचे संबंध आहेत. लाडगाव, सावखेड गंगा, वांजरगाव या गावातील जनतेचा श्रीरामपूरशी नियमित संपर्क आहे. सरांना बेट येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा हा रस्ता सोयीचा आहे. मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याने त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. नसून ताप असून संताप अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. सध्याच्या रस्त्याचे काम गेल्यावर्षी झाले. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या कामांमध्ये रस्त्याची आणखी दुरावस्था झाली. सध्याच्या रस्त्यावर गाड्या धावतच नाहीत. त्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो तसेच गाड्या पंचर होण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यासाठी श्रीरामपूर वैजापूर रस्त्याचे चांगल्या प्रकारे मजबुतीकरण होऊन चौपदरीकरण झाल्यास मराठवाड्यात जाण्यासाठी हा अत्यंत सोयीचा रस्ता असून पुढे समृद्धी महामार्गाला देखील त्याला जोडता येईल. तेव्हा हे काम फक्त खासदार सदाशिव लोखंडे करू शकतात कारण त्यांचे व नितीन गडकरी यांचे जुने संबंध आहेत. गडकरी साहेबांसाठी या रस्त्यास निधी देणे ही अतिशय किरकोळ बाब आहे. खासदार सुजयदादा विखे यांनी नगर दक्षिण मध्ये 25 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणले. त्याचप्रमाणे खासदार लोखंडे साहेबांनी सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये गडकरी साहेबांकडून असेच रस्ते विकास निधी आणावा त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी भरीव निधी आणून कायमस्वरूपी या रस्त्याची कटकट काढून टाकावी आणि हा रस्ता मजबूत करावा. गोदावरी नदीवर पुल हा प्रशस्त असल्याने तेथे पुल करायची आवश्यकता नाही. फक्त नदीच्या दोन्ही बाजूकडील रस्ते चांगले मजबूत व्हावेत ही या जनतेची अपेक्षा आहे .

सदरचा रस्ता चांगला झाल्यास त्याच्या फायदा श्रीरामपूरच्या बाजारपेठेला देखील होणार आहे तसेच सराला बेट येथे येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. जिल्ह्यातील आजी माजी मंत्री सराला बेट ला नियमित येतात. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. फक्त राजकारण करतात जनतेची सोय मात्र कोणी पाहत नाही. मात्र खासदार लोखंडे या सर्व बाबींना अपवाद आहेत. कमी बोलणारा परंतु काम करणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. तेव्हा आता खासदार लोखंडे यांनी श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून खैरी निमगाव पासून वैजापूर पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व चौपदरी होण्यासाठी विशेष निधी आणून या  भागातील जनतेची वर्षानुवर्षाची समस्या दूर करावी आणि जनतेचे आशीर्वाद घ्यावेत अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील या रस्त्याचा नियमित वापर करणाऱ्या जनतेने व्यक्त केली आहे .

श्रीरामपूर - वैजापूर तालुक्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पूल माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नाने झाला. त्यांच्यानंतर मात्र आलेल्या कोणत्याही आमदाराने या रस्त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. गोदाकाठचा परिसर खोलवर मातीचा असल्यामुळे रस्त्याचे कामांमध्ये सातत्य राहत नाही. अनेक वर्षानंतर गेल्या वर्षी हा रस्ता डांबरीकरण झाला. मात्र त्याला आता मोठमोठे खड्डे पडले आहे. सध्या तर या रस्त्यावरून जाणे मोठे दुरापास्त झाले आहे. वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी कोणीही चालवू शकत नाही. एवढी बिकट अवस्था रस्त्याची झालेली आहे. खासदार लोखंडे यांच्यासाठी हे काम फार किरकोळ आहे. तेव्हा त्यांनी आपले वजन खर्च करून नामदार गडकरी यांचेकडून या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि या रस्त्याचे काम वर्षभरामध्ये पूर्ण करावे अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर - वैजापूर दरम्यानचा विद्यमान रस्ता हा दर्जेदार होण्याऐवजी दर्जाहीन झाला आहे. वैजापूर विभाग व श्रीरामपूर विभाग बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. श्रीरामपूर ते नाऊर पर्यंत रस्ता तर खूपच खराब झाला आहे.गेल्या वर्षीच  हा रस्ता झाला. कोटयवधी रुपये त्यावर खर्च दाखवण्यात आला. मात्र त्याचा दर्जा तपासायची वेळ आता आली आहे.या रस्त्याचे दुर्भाग्य म्हणजे अनेक वर्ष न्यायालयीन प्रकारामुळे हा रस्ता दुर्लक्षित होता. कसाबसा तो प्रश्न मिटल्यानंतर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने जनतेला तोंड झोडून घेण्याची वेळ आता आली आहे. आमदार लहू कानडे, आमदार रमेश बोरणारे यांनी फारसे लक्ष न घातल्याने या ३० किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागू शकतो असा विश्वास दोन्ही तालुक्यातील लोकांना आहे. लोखंडे हे कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे खासदार म्हणून राज्यात परिचित आहेत. तेव्हा त्यांनी आपले वजन वापरून श्रीरामपूर- वैजापूर रस्त्याची दुरावस्था दूर करून या रस्त्याचे मजबुतीकरण, विस्तारीकरण व चौपदरीकरण करण्याच्या कामांमध्ये लक्ष घालावे व श्रीरामपूर वैजापूर मार्फत अहमदनगर जिल्हा व मराठवाडा विभाग जवळ आणण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे अशी विनंती नाऊर, जाफराबाद, खैरी निमगाव, सावखेड गंगा, लाडगाव, वांजरगाव या भागातील जनतेने केली आहे.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या प्रेमात पडावे.आज विद्यार्थीचे ध्येय दिवसाला दीड जीबी डाटा संपवणे बनलेले आहे.दीड जीबी डाटा रोज संपवणे आजच्या तरुण पिढीचे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे का? असा सवाल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला.न्यू इंग्लिश स्कूलचे महत्व विशद करताना त्यांनी हे ही सांगितले की आई ही मुलांची पहिली शाळा आहे,तर शाळा ही मुलांची पहिली आई असते.

आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असून यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक व आपल्या अभ्यासातील प्रगतीसाठी करावा.पोलीस दलातील माणसे हे परग्रहावरील नसून ती आपल्यातलीच आहे असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. पोलीस दलामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपले अनेक अनुभव विद्यार्थ्यां व पालकांसमोर श्री मिटके यांनी व्यक्त केले.

वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मिटके,अविनाश कुदळे, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,अनुजा टेकावडे,प्रतीक्षित टेकावडे,बाळासाहेब ओझा,विधिज्ञ दादासाहेब औताडे,संगीता कासलीवाल, अरुण पुंड,प्राचार्या जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड आदींच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून हिरण जेठवा हिचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात २०१९ ते २०२१ पर्यंत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यानंतर ज्युनिअर के जी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व वाहवा मिळवली.

 वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर २४ डिसें.: श्रीराम अकॅडमी सी.बी.एस.ई. शाळेचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दि. २० डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 'पौर्वात्य-पाश्चात्य' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम डावखर लॉन्स, गोंधवणी रोड या सभागृहात सादर करण्यात आला. 

           विविध कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.  मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तसेच पाल्यांना जबाबदारीचे जाणीव करून देणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच हिंदी अथवा मराठी भाषेतून आपण ऐकलेल्या जाहिरातीचे संस्कृत भाषेतून सादरीकरण करण्यात आले. 

               यावेळी कॅनरा बँक, श्रीरामपूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक नंदराज कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तसेच भैरवनाथ नगर ग्राम पंचायतीचे सरपंच भारत तुपे,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन राम टेकावडे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,ॲडव्हायझरी कमिटी सदस्या,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पुंड हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका जयश्री पोटघन यांनी शालेय वार्षिक अहवाल सादर केला.

           वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . बालचमुंनी कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. ' रामायण महाभारतावरील नृत्य सादरीकरण' कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सोहळ्याची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली. व्यवस्थापन समितीकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे शालेय १९ वर्षाखालील मुला-मुलींचे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हाभरातून १४ तालुक्यातील विजयी संघ सहभागी झाले होते. श्रीरामपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने पहिल्या सामन्यात अकोला तालुका, दुसऱ्या सामन्यात राहुरी तालुका तर उपांत्य फेरीचा लढतीत श्रीगोंदा तालुक्याचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रीरामपूर तालुक्याचा सामना रंगला तो बलाढ्य नेवासा संघाबरोबर.भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी नेवासाची रक्षा खेनवार तिच्याविरुद्ध खेळताना श्रीरामपूरच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. श्रीरामपूर संघाची कर्णधार खुशी यादव,वेदश्री नवले,सुहानी यादव, समृद्धी अभंग, त्रिशा वाघ, श्रावणी पवार,प्राप्ती जैत, देवांशी यादव, समीक्षा शिवरकर आधी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. उपविजेता संघाला क्रीडाशिक्षक नितीन गायधने यांचा मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या संघाचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब घाडागे पाटील,सचिव प्रतीक्षित टेकावडे,सदस्य विधीज्ञ दादासाहेब औताडे,बाळासाहेब ओझा, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष पार्थ दोशी,प्राचार्या जयश्री पोडघन, प्राचार्य डॉ योगेश पुंड,पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव दादासाहेब तुपे,नितीन बलराज, नितीन तमनार तसेच शाळेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


कोट: उपविजेता श्रीरामपूर संघाला त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडून विशेष ₹ १५००/- रुपये पारितोषिक देण्यात आले. यावेळी घाडगे पाटलांनी व्हॉलीबॉल व इतर खेळांना लागेल ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील श्रीगोंदा तालुका तर अंतिम सामन्यात नेवासा तालुका संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करेल. विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget