कोट: उपविजेता श्रीरामपूर संघाला त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडून विशेष ₹ १५००/- रुपये पारितोषिक देण्यात आले. यावेळी घाडगे पाटलांनी व्हॉलीबॉल व इतर खेळांना लागेल ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजला उपविजेतेपद.
श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे शालेय १९ वर्षाखालील मुला-मुलींचे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हाभरातून १४ तालुक्यातील विजयी संघ सहभागी झाले होते. श्रीरामपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने पहिल्या सामन्यात अकोला तालुका, दुसऱ्या सामन्यात राहुरी तालुका तर उपांत्य फेरीचा लढतीत श्रीगोंदा तालुक्याचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रीरामपूर तालुक्याचा सामना रंगला तो बलाढ्य नेवासा संघाबरोबर.भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी नेवासाची रक्षा खेनवार तिच्याविरुद्ध खेळताना श्रीरामपूरच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. श्रीरामपूर संघाची कर्णधार खुशी यादव,वेदश्री नवले,सुहानी यादव, समृद्धी अभंग, त्रिशा वाघ, श्रावणी पवार,प्राप्ती जैत, देवांशी यादव, समीक्षा शिवरकर आधी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. उपविजेता संघाला क्रीडाशिक्षक नितीन गायधने यांचा मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या संघाचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब घाडागे पाटील,सचिव प्रतीक्षित टेकावडे,सदस्य विधीज्ञ दादासाहेब औताडे,बाळासाहेब ओझा, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष पार्थ दोशी,प्राचार्या जयश्री पोडघन, प्राचार्य डॉ योगेश पुंड,पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव दादासाहेब तुपे,नितीन बलराज, नितीन तमनार तसेच शाळेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment