विविध कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तसेच पाल्यांना जबाबदारीचे जाणीव करून देणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच हिंदी अथवा मराठी भाषेतून आपण ऐकलेल्या जाहिरातीचे संस्कृत भाषेतून सादरीकरण करण्यात आले.
यावेळी कॅनरा बँक, श्रीरामपूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक नंदराज कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तसेच भैरवनाथ नगर ग्राम पंचायतीचे सरपंच भारत तुपे,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन राम टेकावडे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,ॲडव्हायझरी कमिटी सदस्या,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पुंड हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका जयश्री पोटघन यांनी शालेय वार्षिक अहवाल सादर केला.
वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . बालचमुंनी कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. ' रामायण महाभारतावरील नृत्य सादरीकरण' कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सोहळ्याची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली. व्यवस्थापन समितीकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले.
Post a Comment