Latest Post

श्रीरामपुर प्रतिनिधि-क्रांति गुरू लहुजी साळवे यांचे विचारने काम करणाय्रा व्याक्तिंच्या कामांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना वेगवेगळ्या सम्मान पञाने सम्मानित करण्याचा यज्ञ गेल्या अनेक वर्षापासुन सुरू ठेवलेला आहे 

दि,१४/११/२०२२ रोजी क्रांति गुरू लहुजी साळवे यांच्या २२८व्या जयंती सोहळा भारतीय लहुजी सेनाबमार्फत संपूर्ण राज्यभर साजरा होत असलेने   या कार्यक्रमाची सांगता दि , ३०/११/२०२२ रोज़ी श्रीरामपुर येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे क्रांति गुरू लहुजी साळवे जन्म उत्सव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथि इंजि के के आव्हाड,  राष्ट्रीय अध्याक्ष  बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा अध्यक्ष रज्जाक भाई शेख, यांचे प्रमुख उपस्थितीत पाहुण्यांना पुरस्कार मानचिन्ह, श्रीफळ, हार व शाल देवून गौरवण्यात आले .


   सदर जयंती उत्सावाकरीता लहुजी गर्जना आर्केस्ट्रा गित गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रामात राज्यप्रमुख सुरेश अढागळे, जिल्हा कार्यअध्यक्ष शांतवन खंडागळे, महंत नारायणगिरी महाराज, औरंगाबाद जिल्हा प्रमुख शकील शेख, या प्रमुख अतिथि यांनी प्रमुख्याने कार्यक्रमास हजर राहुन या कार्यक्रमास यशस्वी करण्यास प्रयत्न केले सदर कार्यक्रमात लहुजी सेनेचे रईस भाई शेख यांना युवा उद्योजक या पुरस्काराने गौरवण्यात आले ह भ प प्रतिभाताई जाधव यांना  समाज जागृति पुरस्काराने गौरवण्यात आले हभप ज्ञानेश्वर महाराज अढाव याना अनाथाच्या कार्यबद्दल नाथ पुरस्काराने गौरवण्यात आले, अर्जुन भाऊ दाभाडे याना हिंदु रक्षक  पुरस्काराने गौरवण्यात आले, तर राजेंद्र आल्हाट यांना वॄक्षमित्र पुरस्काराने गौरवण्यात आले, भाऊसाहेब शेलार समाज मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले राजेश घोरपडे साहेब श्रीरामपुर भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, हाजी लतीफ भाई सय्यद याना मौलाना आजाद समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, अजहर भाई शेख याना डॉ अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले, ऑड लतीफ शेख याना विधि सेवक या पुरस्काराने गौरवण्यात आले, आसलम बिनसाद याना बाळशास्त्री जांभेळकर समाज प्रबोधन भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले सोहेल भाई शेख युवा भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, सुभाष दादा त्रिभुवन यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, विजय भाऊ पवार यांना नवयुवक स्वाभिमान पुरस्कारने गौरवण्यात आले मंजूषा ताई ढोकचौळे यांना आदर्श महिला समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले निलेश मोहन एडके यांना  युवागौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, ऑड  लक्ष्मीकांत दुधकवडे याना लोक न्याय रक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले सुनिल शिदे याना कृषिभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले अभिमान कामळे याना क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले, आनंद बोधरा याना उद्योजक रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले सुनील सकट याना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले ,   रंजीत बारहाळीकर याना कुशल संघटन पुरस्काराने गौरवण्यात आले,    जगन्नाथ कोरडे याना कृषिसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले, बाळासाहेब कदम यांना प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात  आले सौ रूपाली नवले यांना आदर्श शिक्षका या पुरस्काराने गौरवण्यात आले तौफीक पठाण यांना कोविड योध्दा या पुरस्काराने गौरवण्यात आले,  

     सदर कार्यक्रम यशस्वीकरीता राजेंद्र ञिभुवन ,सिकंदर ताबोली,फैजन पठान, शुभंम बाळासाहेब बागुल, संदीप शेडगे सलमान पठान, मेहमुद पठान, रमेज पोपटीया, रमेश खामगर,  विशाल मोज़े युसुफ शेख, संजय ससाने विजय शेलार ,बाबा शिदे बरकत अली  शेख, अब्दुल शेख, खाजेखर, संतोष मोकळ,अकबर भाई शेख, मुसा पटेल ताराचंद खंडागळे, रामभाऊ पिंगळे ,भाऊसाहेब आव्हाड, सोमनाथ गायकवाड़, मंगलाताई चव्हाण ,मिसाळ साहेब ,आसीफ शेख, आमजन कुरेशी शेरू कुरेशी,मतीन कुरेशी, साबिर शाह संजय शिरसाठ राजू शेलार रमजान शेख, आदि कार्यकत्यानी  विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्रात मोठ्या  प्रमाणातुन कार्यकर्ते उपस्थित होते .तसेच शेवटी औरंगाबाद जिल्हा प्रमुख शकील शेख यांनी या सर्वाचे आभार व्याक्त केले .

अहमदनगर प्रतिनिधी-पोलिस.निरिक्षक.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा इसम पाथर्डी तालुक्यातील करंजी गांवातील बस स्टॅण्ड परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाथर्डी तालुक्याती करंजी गांवातील बस स्टॅण्ड, येथे जावून सापळा लावुन थोड्याच वेळात एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसला. पोलीस पथकाची खात्री   झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीतास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) शेरखान मुबारक पठाण, वय 35, रा. करंजी, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 25,300/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हा पाथर्डी परिसरात एक (01) गावठी कट्टा व एक (01) जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ/विनोद शिवाजी मासाळकर नेमनुक  स्थागुशा यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



श्रीरामपूर : आगामी होऊ घातलेल्या,  राहाता तालुक्यातील रांजनखोल ग्रामपंचायत निवडणुकीत,वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याची अधिकृत माहिती, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशालभैया कोळगे व चरणदादा त्रिभुवन यांनी दिली असून. १८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत, गावातील घराणेशाही तसेच राजकीय मक्तेदारी मोडून काढण्यासाठी. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वाघ यांच्या पत्नी सौ विजया ताई वाघ यांच्या सरपंच पदासाठीच्या  उमेदवारीवर शिक्का मूर्तब करण्यात आला असून. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सौ विजया ताई वाघ यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याची माहिती.वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशालभैया कोळगे व चरणदादा त्रिभुवन यांनी घेतलेल्या बैठकीत दिली आहे. तसेच सर्व समावेश आणि गावाच्या पारदर्शी कारभारासाठी, रांजनखोल ग्रामपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सर्वच अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करून सदरील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक ०५ डिसेंबर २०२२ पासून येथील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर समाजवादी पार्टीच्यावतीने साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, शहर व तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसाय बंद व्हावे या मागणीसाठी आम्ही श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला दि. १०/११/२०२२ रोजी लेखी निवेदन नोंदवूनही संबंधित पोलिस प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे गुटखा,मटका , पत्त्यांचे क्लब,सोरट वगैरे असे विविध प्रकारचे सर्वच अवैध व्यवसाय हे सर्रासपणे खुलेआम सुरुच असल्यामुळे नाईलाजाने सोमवार दिनांक ०५ / १२ / २०२२ पासून येथील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.तसेच यापासून उद्भवणाऱ्या बऱ्या व वाईट परिणामास संबंधित प्रशासनच जबाबदार राहील असेही श्री.जमादार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.या निवेदनाच्या प्रति.पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मा.जिल्हाधिकारी अहमदनगर,जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर, पोलीस निरीक्षक,श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन, मुख्याधिकारी,श्रीरामपूर न.पा. श्रीरामपूर आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूर : शहरात रासरोजपणे सुरू असलेल्या, मटका, गुटखा, गांजा विक्री, पत्त्याचा क्लब, सोरट, ऑनलाइन बिंगो हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे. याकरिता भाजपा अनूसुचित जाती मोर्चा व भाजपा भटक्या विमुक्त आघाडी च्या वतिने, पै. सागर साहेबराव शिंदे व जिल्हा आघाडी प्रमुख दत्तात्रय खेमनर यांनी महात्मा गांधी पुतळ्या समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. सदरच्या आंदोलनाची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी,उपोषणार्थ्यांची भेट घेऊन. शहरात सुरु असलेल्या अवैध व्यावसायां विरोधात सातत्याने पोलीस कारवाई करत असून. आपण पोलिसांकडे तक्रार दिल्यास, १०० टक्के कारवाई करण्याचे आश्वसन दिल्याने.भाजपा अनूसुचित जाती मोर्चा व भाजपा भटक्या विमुक्त आघाडी च्या वतिने सुरू करण्यात आलेले, आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी  सपोनि विठ्ठल पाटील, पोना रघुवीर कारखीले, सोमनाथ गाढेकर यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवुन जलसंपदा विभागात उपअभियंता पद मिळविणाऱ्या बेलापुरातील दोन जणांना आज सायंकाळी मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे                महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सन २०१९ ला परीक्षा उत्तीर्ण झालेले तालुक्यातील बेलापुर गावातील दोन जणाना आज सायंकाळी आठ वाजता यशवंतराव प्रतिष्ठाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे त्यात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक ,जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांचे चिरंजीव अभिषेक देसाई व निखील सुनिल शहाणे यांचा समावेश आहे त्या बद्दल देसाई  व शहाणे परीवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .

श्रीरामपूर : सायंकाळी ७ ते सव्वा ७ वाजेच्या सुमारास, तालुक्यातील श्रीरामपूर नेवासा मार्गावर असलेल्या. खोकर फाटा येथील अन्नपुर्ण मंगल कार्यालया समोर, ऊस घेऊन जात असलेली एम एच १८ एन ८९६२ क्रमांकाची ट्रक बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी असतांना. नेवासाहून - श्रीरामपूर ला येत असलेली एम एच १७ सी यु ३२८४ क्रमांकाची दुचाकी येऊन धडकल्याने आपघात झाला. या आपघातात दुचाकीवर असलेले, श्रीरामपूर येथील २० वर्षीय गणेश राजू ससाणे व २१ वर्षीय योगेश अशोक यादव हे युवक गंभीर जखमी झाले होते. सदर आपघाता संदर्भात माहिती मिळताच, तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय अतुल बोरसे पोलीस हवालदार मन्सूर शेख,अनिल शेंगाळे व चालक चांद भाई पठाण यांनी घटनास्थळी दाखल होऊन. त्यांनी दोन्ही युवकांना तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात आणले असता. डॉक्टरांनी दोन्ही युवकांना मयत घोषित केले, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वच साखर कारखान्याचे गाळप सुरू झाल्याने. मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक देखील  सुरू झाली आहे. ही ऊस वाहतूक करत असतांना, साखर कारखाना तसेच ऊस उत्पादक शेकऱ्यांनी, शासनाच्या नियमांचे पालन करून, अंधारात देखील ऊस वाहतूक करणारे वाहने दिसतील,तसेच चांगल्या अवस्थेतील वाहनांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेत ऊस वाहतूक केल्यास अनेक आपघात टळतील, त्याच बरोबर आरटीओ व पोलीस प्रशासनाने  देखील उपाय योजना कराव्यात अशी मागणी, नागरिकां मधून केली जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget