श्रीरामपुर (प्रतिनिधी )-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवुन जलसंपदा विभागात उपअभियंता पद मिळविणाऱ्या बेलापुरातील दोन जणांना आज सायंकाळी मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सन २०१९ ला परीक्षा उत्तीर्ण झालेले तालुक्यातील बेलापुर गावातील दोन जणाना आज सायंकाळी आठ वाजता यशवंतराव प्रतिष्ठाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे त्यात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक ,जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांचे चिरंजीव अभिषेक देसाई व निखील सुनिल शहाणे यांचा समावेश आहे त्या बद्दल देसाई व शहाणे परीवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .
Post a Comment