खोकर फाट्यावर ऊस ट्रक - दुचाकीचा आपघात, २ युवकांचा दुर्दैवी मृत्यू.
श्रीरामपूर : सायंकाळी ७ ते सव्वा ७ वाजेच्या सुमारास, तालुक्यातील श्रीरामपूर नेवासा मार्गावर असलेल्या. खोकर फाटा येथील अन्नपुर्ण मंगल कार्यालया समोर, ऊस घेऊन जात असलेली एम एच १८ एन ८९६२ क्रमांकाची ट्रक बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी असतांना. नेवासाहून - श्रीरामपूर ला येत असलेली एम एच १७ सी यु ३२८४ क्रमांकाची दुचाकी येऊन धडकल्याने आपघात झाला. या आपघातात दुचाकीवर असलेले, श्रीरामपूर येथील २० वर्षीय गणेश राजू ससाणे व २१ वर्षीय योगेश अशोक यादव हे युवक गंभीर जखमी झाले होते. सदर आपघाता संदर्भात माहिती मिळताच, तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय अतुल बोरसे पोलीस हवालदार मन्सूर शेख,अनिल शेंगाळे व चालक चांद भाई पठाण यांनी घटनास्थळी दाखल होऊन. त्यांनी दोन्ही युवकांना तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात आणले असता. डॉक्टरांनी दोन्ही युवकांना मयत घोषित केले, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वच साखर कारखान्याचे गाळप सुरू झाल्याने. मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक देखील सुरू झाली आहे. ही ऊस वाहतूक करत असतांना, साखर कारखाना तसेच ऊस उत्पादक शेकऱ्यांनी, शासनाच्या नियमांचे पालन करून, अंधारात देखील ऊस वाहतूक करणारे वाहने दिसतील,तसेच चांगल्या अवस्थेतील वाहनांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेत ऊस वाहतूक केल्यास अनेक आपघात टळतील, त्याच बरोबर आरटीओ व पोलीस प्रशासनाने देखील उपाय योजना कराव्यात अशी मागणी, नागरिकां मधून केली जात आहे.
Post a Comment