उच्च न्यायालयाचा आदेश,बाजार समितीची निवडणुक लांबणीवर.
श्रीरामपूर प्रतिनिधी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुकी संदर्भात,औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला असून. यासंदर्भात माजी सभापती दिपक पटारे यांनी, कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत,तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभाग घेता यावा. याकरिता काही आठवड्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका दाखल केली होती. सदरच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, न्यायालयाने पटारे यांच्या बाजूने निकाल देत. शासनाच्या नवीन अद्यादेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक घ्यावी असे आदेश दिले असून. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुक १५ मार्च २०२३ नंतर होणार असल्याची माहिती, याचिका कर्त्यांचे वकिल ॲड. विनायक होन व ॲड. सिध्देश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.
Post a Comment