अवैध व्यवसायांवर कारवाईचे आश्वासनानंतर भाजपाचे आंदोलन मागे.
श्रीरामपूर : शहरात रासरोजपणे सुरू असलेल्या, मटका, गुटखा, गांजा विक्री, पत्त्याचा क्लब, सोरट, ऑनलाइन बिंगो हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे. याकरिता भाजपा अनूसुचित जाती मोर्चा व भाजपा भटक्या विमुक्त आघाडी च्या वतिने, पै. सागर साहेबराव शिंदे व जिल्हा आघाडी प्रमुख दत्तात्रय खेमनर यांनी महात्मा गांधी पुतळ्या समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. सदरच्या आंदोलनाची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी,उपोषणार्थ्यांची भेट घेऊन. शहरात सुरु असलेल्या अवैध व्यावसायां विरोधात सातत्याने पोलीस कारवाई करत असून. आपण पोलिसांकडे तक्रार दिल्यास, १०० टक्के कारवाई करण्याचे आश्वसन दिल्याने.भाजपा अनूसुचित जाती मोर्चा व भाजपा भटक्या विमुक्त आघाडी च्या वतिने सुरू करण्यात आलेले, आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सपोनि विठ्ठल पाटील, पोना रघुवीर कारखीले, सोमनाथ गाढेकर यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.
Post a Comment