रांजणखोल सरपंच निवडणुकीसाठी, वंचित आघाडी कडून विजया वाघ यांना उमेदवारी.
श्रीरामपूर : आगामी होऊ घातलेल्या, राहाता तालुक्यातील रांजनखोल ग्रामपंचायत निवडणुकीत,वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याची अधिकृत माहिती, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशालभैया कोळगे व चरणदादा त्रिभुवन यांनी दिली असून. १८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत, गावातील घराणेशाही तसेच राजकीय मक्तेदारी मोडून काढण्यासाठी. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वाघ यांच्या पत्नी सौ विजया ताई वाघ यांच्या सरपंच पदासाठीच्या उमेदवारीवर शिक्का मूर्तब करण्यात आला असून. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सौ विजया ताई वाघ यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याची माहिती.वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशालभैया कोळगे व चरणदादा त्रिभुवन यांनी घेतलेल्या बैठकीत दिली आहे. तसेच सर्व समावेश आणि गावाच्या पारदर्शी कारभारासाठी, रांजनखोल ग्रामपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment