Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अपघात टाळण्यासाठी ऊस वहातुक करणाऱ्या वाहनांना तातडीने रेडीयम व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत अशी मागणी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .                                प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देविदास देसाई यांनी पुढे म्हटले आहे की ऊस वहातुक करणारी वाहने भरधाव वेगाने चाललेली असतात एका ट्रक्टरला दोन दोन ट्राँली जोडलेली असतात रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे ऊस वहातुक करणारे वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते तसेच ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते पाठीमागे असणाऱ्या वाहनाने हाँर्न वाजविला तरी मोठ्या आवाजात असलेल्या गाण्यामुळे चालकाच्या ते लक्षात येत नाही तो चालक केवळ गाण्याच्या तालातच वाहन चालवत असतो त्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनावर मोठा स्पिकर लावण्यास परवानगी देवु नये ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठाले स्पिकर असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी तसेच परिवहन कार्यालयाने तसे लेखी पत्र संबधीत साखर कारखान्यांना द्यावे  असेही देसाई यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :श्रीरामपूर शहर व तालुकाभर सुरु असलेले सर्वच अवैध व्यावसाय त्वरित बंद करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देत सदरील व्यावसाय बंद न झाल्यास येत्या ५ डिसेंबर रोजी उपोषण करणार असल्याबाबत पोलिसांत निवेदन दिल्याचा राग मनात धरुन येथील समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी तसेच समाजवादी पक्ष नेत्यांविषयी व्हॅटसअप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत करुन बदनामी केल्याप्रकरणी तथा तक्रारदार श्री.जमादार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सदरील अवैध  व्यावसायिकास त्वरीत अटक करण्यात यावी अशा अशयाची तक्रार त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत दाखल केली असून या तक्रारपत्रांच्या प्रती संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठविण्यात आल्या आहे.

श्री.जमादार यांनी या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, व्हॅटसअप ग्रुपवर एका अवैध गुटखा व्यावसायिकाने आमच्या समाजवादी या राजकीय पक्षाच्या आणि पक्ष नेत्यांच्या बाबतीत नकली समाजवादी नेता अशी पोस्ट टाकून आमच्यासह सर्वच समाजवादी पक्ष नेत्यांची बदनामी केली आहे,

या लोकांचा श्रीरामपुर शहर व तालूक्यात अवैध गुटखा तसेच मावा तसेच त्याचबरोबर अंमली पदार्थाचा मोठा अवैध व्यवसाय असल्याने या व्यवसायला संरक्षण मिळावे म्हणून वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे गुंड लोक त्याचबरोबर स्त्रीयांचाही मोठा सहभाग या लोकांनी घेतलेला आहे.सादर गुंड लोकांना व स्त्रियांना हाताशी धरून जातिवाचक शिवीगाळ ,विनयभंग वगैरे स्वरुपाच्या बनावट केसेस आमचे व आमच्या कुटुंबाचे तसेच आमच्या संघटने च्या पदाधिकार्या विरुद्ध हे लोक करनारे आहेत. तसेच आम्ही रहात असलेल्या ठिकानी काही अनोळखी तरुण हे घराची टेहाळनी करीत असल्याचे आम्हांला समजते आहे, तसेच हे लोकं नेहमीच म्हणत असतात की आम्ही मेमन जमातीचे लोकं असुन संपूर्ण देश मेमन लोकांना घाबरतो कारण आमचे शेजारील देशासी देखील जवळचे संबंध आहे,तथा शेजारील देशात आमचे बहुसंख्य नातेवाईकही आहेत असे म्हणत नेहमी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,तसेच रस्त्याने जाता- येता वाहने अंगावर घालण्याचा देखील प्रकार करत जीवे मारण्याची धमकी देतात यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबायांच्या जीवीतास यामुळे धोकाही निर्माण झाला आहे, करीता सदरील व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यास त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा या आक्षेपार्ह पोस्टमुळे आमचेही कार्यकर्त्यांच्या मनात चिड निर्माण होऊन  यापासून मोठा वाद निर्माण होत परिस्थिती हाताबाहेरही जावू शकते,करीता आपण या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन या महाभागावर वेळेतच उचित व योग्य कारवाई करावी असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या, दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची, गांभीर्याने दखल घेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना कारवाईचे आदेश देताच.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,डीवायएसपी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून,सी.सी.टी.व्ही. फुटेज,गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबींच्या आधारे, वार्ड नंबर २ बीफ मार्केट येथील, इब्राहिम गणी शहा नावाच्या आरोपीस ताब्यात घेऊन. त्याच्या ताब्यातून ९ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या, २० चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, श्रीरामपूर पोलिसांचे कौतुक करत,पकडलेल्या आरोपीने अनेक गाड्या चोरून, भंगार मध्ये विकल्याची कबुली दिल्याने, पोलीस इतर आरोपीचा शोध घेत असून.आरोपीने केलेल्या आणखीन गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी  दिली आहे. सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक प्रशांत बारसे,भैरव अडागळे,रघुवीर कारखेले,सोमनाथ गाडेकर, विरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,मच्छिंद्र कातखडे, प्रविण क्षिरसागर,गौतम लगड,रमिझराजा अत्तार, गणेश गावडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

श्रीरामपूर : पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपुर शहर पोलीसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईच्या चालता. १२ नोव्हेंबरच्या श्रीरामपूर - बेलापूर रोडवर, रात्री पाऊने १२ च्या सुमारास, एकलहरे येथील खंडागळे दाम्पत्याला रस्तात आडून, त्यांच्या जवळील हिरो स्प्लेंडर व ३ ग्रॅम सोन्याचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाचा तपासा दरम्यान. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके  पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, तात्काळ शहर पोलिसांनी, राहुरी येथील अक्षय कुलथे, विशाल ऊर्फ गणेश शेटे व दिपक रामनाथ या तिघा आरोपींना,५ लाख ८५ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने.  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलीसांचे कौतुक केले आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे,पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर तांत्रिक विभाग फुरकान शेख हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके,पोलीस नाईक गणेश भिंगारदे,पोलीस नाईक संजय पवार, रघुवीर कारखेले, विरप्पा करमल, सोमनाथ गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, रमिझराजा अत्तार,गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, हरीष पानसंबळ, संपत बडे,नंदकुमार लोखंडे, भारत तमनर आदींनी यशस्वी पार पाडली.

लोणी प्रतिनिधी- पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना गोपानीय माहिती मिळाली होती की राहाता तालुक्यातील ममदापुर गावात कुरेशी मोहल्ला या ठिकाणी गोवंशिय जनावरांची कत्तल सुरु आहे. मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार तसेच वरिष्ठाच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस पथका समवेत सदरच्या ठिकाणी छापा टाकला असता गोवंश जातीचे मांस तसेच 6 गोवंश जातीच्या गायी, 6 गोवंश जातीचे वासरे व महिंद्रा कंपनीची पिक अप क्र. MH 03 AH 2408 असा एकुण 5,68,000/-रुपये किमतीचा मुद्दमाल जप्त करण्यात आला असुन जब्बार हसन शेख वय 45 वर्ष रा.ममदापुर ता.राहाता, कैफ रउफ कुरेशी वय 22 वर्ष रा.कुरेशी मोहल्ला ममदापुर ता.राहाता, जावीद नाजुक खाटीक वय 33 वर्ष रा.कुरेशी मोहल्ला ममदापुर ता.राहाता व कृष्णा एकनाथ गोरे रा. ममदापुर ता.राहाता यांचे विरुध्द लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं.558/2022 महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधिनीयम 1995 चे सुधारीत कलम 5 (अ),5(क) सह 9 तसेच प्राण्याना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिले आहे.सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुदाम फटांगरे, पो.ना. आसीर सय्यद, पो.ना. दिपक रोकडे, पो.ना.कैलास भिंगारदिवे यांच्या पथकाने केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिल्याने.जिल्ह्यात  दरदिवस मोठ्या कारवाई होत आहेत. या कारवाईच्या चालता, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की. शहरातील धनगरवस्ती येथील, आहेल्यादेवी नगर परिसरात गौवंशिय जनावरांची कत्तल होत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गवळी यांनी ,तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना,कर्मचा-यां सोबत कारवाईसाठी रवाना केलेलं असता. शहर पोलिसांनी कत्तल केलेली तब्बल आडीज टन वजनाची ४० जनावरे व ३ जिवंत वासरांसह ,आरोपी तोहसिफ मोहंमद कुरेशी वय वर्ष २५,राहणार वार्ड नंबर २ यास ताब्यात घेतले असून. आरोपीं विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कालमांन्वये गुन्हा दाखल केला असून. यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील,पोलीस नाईक रघुवीर कारखीले,बिरप्पा करमल, सोमनाथ गाढेकर,संपत बडे, शिवाजी बडे, भारत जाधव,आजीनाथ आंधळे, दत्तात्रय सातकर, ज्ञानेश्वर गुंजाळ, आजीनाथ माळी आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पारपडली.

शेवगाव प्रतीनिधी-श्रीरामपूर Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की,शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रातून चोरून वाळू वाहतूक करत आहेत.त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा घालण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार सदर पथकाने छापा घालून  चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी क्र.1)  अश्पाक सुलेमानं शेख याचे ताब्यातून एक पिवळ्या रंगाचा  जे.सी.बी.  एकूण 20,00,000/- रुपयांचा  आणि आरोपी क्र) 2 गणेश चंद्रकांत केदार याचे ताब्यातून एक आकाशी रंगाचा  डम्पर  व 3 ब्रास वाळू असा आकाशी 6,15,000/- रुपयांचा मुद्देमाल  असा एकूण 26,15000  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी विरुध्द PC सचिन काकडे यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 821/2022 , भा द वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,Dysp संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली 𝙿𝚜𝚒 भाटेवाल , HC सुरेश औटी, PC नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे,विलास उकीर्डे आदींनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget