अवैध व्यावसायिकाकडून समाजवादी उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांना धमकी ;पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी जमादार यांची पोलिसांत तक्रार दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :श्रीरामपूर शहर व तालुकाभर सुरु असलेले सर्वच अवैध व्यावसाय त्वरित बंद करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देत सदरील व्यावसाय बंद न झाल्यास येत्या ५ डिसेंबर रोजी उपोषण करणार असल्याबाबत पोलिसांत निवेदन दिल्याचा राग मनात धरुन येथील समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी तसेच समाजवादी पक्ष नेत्यांविषयी व्हॅटसअप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत करुन बदनामी केल्याप्रकरणी तथा तक्रारदार श्री.जमादार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सदरील अवैध  व्यावसायिकास त्वरीत अटक करण्यात यावी अशा अशयाची तक्रार त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत दाखल केली असून या तक्रारपत्रांच्या प्रती संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठविण्यात आल्या आहे.

श्री.जमादार यांनी या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, व्हॅटसअप ग्रुपवर एका अवैध गुटखा व्यावसायिकाने आमच्या समाजवादी या राजकीय पक्षाच्या आणि पक्ष नेत्यांच्या बाबतीत नकली समाजवादी नेता अशी पोस्ट टाकून आमच्यासह सर्वच समाजवादी पक्ष नेत्यांची बदनामी केली आहे,

या लोकांचा श्रीरामपुर शहर व तालूक्यात अवैध गुटखा तसेच मावा तसेच त्याचबरोबर अंमली पदार्थाचा मोठा अवैध व्यवसाय असल्याने या व्यवसायला संरक्षण मिळावे म्हणून वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे गुंड लोक त्याचबरोबर स्त्रीयांचाही मोठा सहभाग या लोकांनी घेतलेला आहे.सादर गुंड लोकांना व स्त्रियांना हाताशी धरून जातिवाचक शिवीगाळ ,विनयभंग वगैरे स्वरुपाच्या बनावट केसेस आमचे व आमच्या कुटुंबाचे तसेच आमच्या संघटने च्या पदाधिकार्या विरुद्ध हे लोक करनारे आहेत. तसेच आम्ही रहात असलेल्या ठिकानी काही अनोळखी तरुण हे घराची टेहाळनी करीत असल्याचे आम्हांला समजते आहे, तसेच हे लोकं नेहमीच म्हणत असतात की आम्ही मेमन जमातीचे लोकं असुन संपूर्ण देश मेमन लोकांना घाबरतो कारण आमचे शेजारील देशासी देखील जवळचे संबंध आहे,तथा शेजारील देशात आमचे बहुसंख्य नातेवाईकही आहेत असे म्हणत नेहमी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,तसेच रस्त्याने जाता- येता वाहने अंगावर घालण्याचा देखील प्रकार करत जीवे मारण्याची धमकी देतात यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबायांच्या जीवीतास यामुळे धोकाही निर्माण झाला आहे, करीता सदरील व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यास त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा या आक्षेपार्ह पोस्टमुळे आमचेही कार्यकर्त्यांच्या मनात चिड निर्माण होऊन  यापासून मोठा वाद निर्माण होत परिस्थिती हाताबाहेरही जावू शकते,करीता आपण या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन या महाभागावर वेळेतच उचित व योग्य कारवाई करावी असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget