
श्रीरामपुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उध्वस्त.
श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या, दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची, गांभीर्याने दखल घेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना कारवाईचे आदेश देताच.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,डीवायएसपी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून,सी.सी.टी.व्ही. फुटेज,गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबींच्या आधारे, वार्ड नंबर २ बीफ मार्केट येथील, इब्राहिम गणी शहा नावाच्या आरोपीस ताब्यात घेऊन. त्याच्या ताब्यातून ९ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या, २० चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, श्रीरामपूर पोलिसांचे कौतुक करत,पकडलेल्या आरोपीने अनेक गाड्या चोरून, भंगार मध्ये विकल्याची कबुली दिल्याने, पोलीस इतर आरोपीचा शोध घेत असून.आरोपीने केलेल्या आणखीन गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक प्रशांत बारसे,भैरव अडागळे,रघुवीर कारखेले,सोमनाथ गाडेकर, विरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,मच्छिंद्र कातखडे, प्रविण क्षिरसागर,गौतम लगड,रमिझराजा अत्तार, गणेश गावडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

Post a Comment