अवैध वाळू उत्खनन करणारा जेसीबी, डंपरसह दोन आरोपी जेरबंद 26 लाखाचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूरचे Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची शेवगावात पहाटे कारवाई.
शेवगाव प्रतीनिधी-श्रीरामपूर Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की,शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रातून चोरून वाळू वाहतूक करत आहेत.त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा घालण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार सदर पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी क्र.1) अश्पाक सुलेमानं शेख याचे ताब्यातून एक पिवळ्या रंगाचा जे.सी.बी. एकूण 20,00,000/- रुपयांचा आणि आरोपी क्र) 2 गणेश चंद्रकांत केदार याचे ताब्यातून एक आकाशी रंगाचा डम्पर व 3 ब्रास वाळू असा आकाशी 6,15,000/- रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 26,15000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी विरुध्द PC सचिन काकडे यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 821/2022 , भा द वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर,Dysp संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली 𝙿𝚜𝚒 भाटेवाल , HC सुरेश औटी, PC नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे,विलास उकीर्डे आदींनी केली.
Post a Comment