श्रीरामपूर प्रतिनिधी- पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिल्याने.जिल्ह्यात दरदिवस मोठ्या कारवाई होत आहेत. या कारवाईच्या चालता, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की. शहरातील धनगरवस्ती येथील, आहेल्यादेवी नगर परिसरात गौवंशिय जनावरांची कत्तल होत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गवळी यांनी ,तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना,कर्मचा-यां सोबत कारवाईसाठी रवाना केलेलं असता. शहर पोलिसांनी कत्तल केलेली तब्बल आडीज टन वजनाची ४० जनावरे व ३ जिवंत वासरांसह ,आरोपी तोहसिफ मोहंमद कुरेशी वय वर्ष २५,राहणार वार्ड नंबर २ यास ताब्यात घेतले असून. आरोपीं विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कालमांन्वये गुन्हा दाखल केला असून. यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील,पोलीस नाईक रघुवीर कारखीले,बिरप्पा करमल, सोमनाथ गाढेकर,संपत बडे, शिवाजी बडे, भारत जाधव,आजीनाथ आंधळे, दत्तात्रय सातकर, ज्ञानेश्वर गुंजाळ, आजीनाथ माळी आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पारपडली.
Post a Comment