परिपूर्ण प्रशिक्षण शालेय वयातच मिळावे : जीवन बोरसे

क्रीडा शिबिराचे परितोषिक वितरण समारंभ,श्रीरामपूर : विद्यार्थी दशेत प्रत्येकानेच एक ध्येय निश्चित केल्यास त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केले.येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये दीपावलीच्या सुटीचा सदुपयोग म्हणून जी.एन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १५ दिवसीय दिवाळी क्रीडा शिबिर उत्साहात संपन्न झाले.शिबिराच्या समारोप प्रसंगी बोरसे बोलत होते.अध्यक्षस्थानी सार्थक संस्थेचे सचिव शकील बागवान होते.जीवन बोरसे पुढे म्हणाले,अगदी प्रारंभीच्या काळातच आपल्याला परिपूर्ण प्रशिक्षण मिळाले तर भविष्यात त्या त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविता

येते.पंधरा दिवसीय शिबिरामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.व्हॉलीबॉल, क्रिकेट,रोल बॉल,बास्केटबॉल,स्केटिंग या खेळांच्या प्रशिक्षणाचा समावेश होता.या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक खेळाशी संबधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवून दिले. आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंना सार्थक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह सार्थक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री शकील बागवान,जय हिंद करिअर अकॅडमी चे सुयोग सास्कर, सार्थकचे अध्यक्ष उमेश तांबडे, क्रीडा शिबिराचे आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शकील बागवान यांचेही भाषण झाले. पंधरा दिवसीय शिबिरामध्ये दरदिवशी विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विविध क्षेत्रातील सर्वोत्तम मान्यवरांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.यामध्ये अजय घोगरे (अभिनय व सांस्कृतिक क्षेत्र),सुजाता शेंडगे (प्राणायाम), महेश कोल्हे (कब्बडी), बॉबी बकाल (क्रिकेट), डॉ अमित मकवणा (आहार व खेळातील इजा ), प्रवीण जमदाडे ( मोटिवेशनल ), जयेश सावंत (पत्रकारिता), जतिन सोलंकी (योगा), प्रवीण कुदळे (मर्दानी खेळ), सुयोग सासकर (आर्मी भरती), अभिषेक अन्सिंगकर (अकाउंटिंग) आदींचा समावेश होता.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget