शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल अनिल कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार
अहमदनगर प्रतिनिधी- शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल अनिल कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार दिनांक 04/11/2022 रोजी श्री. निखील बाळासाहेब वाघ, वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगांव, ता. श्रीरामपूर हे रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी चार इसमांनी घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवुन साक्षीदारांना कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी करुन घरातील सामानाची उचका पाचक करुन 2,71,000/- हजार रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घेवुन गेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. राकेशजी ओला साहेब पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने लावून शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री.अनिल जी कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार करताना बाळासाहेब पटारे, पंढरीनाथ वाघ,आनंद वाघ, शिवाजी दौंड ,नवनाथ वाघ, शरद वाघ, शुभम वाघ, निखिल वाघ, सुनील पटारे आदी उपस्थित होते.
Post a Comment