शहर पोलिसांची कारवाई, ३ सोनसाखळी चोर ताब्यात, ४ जबरी चोरीचे गुन्हे उघड.
श्रीरामपूर : पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपुर शहर पोलीसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईच्या चालता. १२ नोव्हेंबरच्या श्रीरामपूर - बेलापूर रोडवर, रात्री पाऊने १२ च्या सुमारास, एकलहरे येथील खंडागळे दाम्पत्याला रस्तात आडून, त्यांच्या जवळील हिरो स्प्लेंडर व ३ ग्रॅम सोन्याचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाचा तपासा दरम्यान. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, तात्काळ शहर पोलिसांनी, राहुरी येथील अक्षय कुलथे, विशाल ऊर्फ गणेश शेटे व दिपक रामनाथ या तिघा आरोपींना,५ लाख ८५ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलीसांचे कौतुक केले आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे,पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर तांत्रिक विभाग फुरकान शेख हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके,पोलीस नाईक गणेश भिंगारदे,पोलीस नाईक संजय पवार, रघुवीर कारखेले, विरप्पा करमल, सोमनाथ गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, रमिझराजा अत्तार,गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, हरीष पानसंबळ, संपत बडे,नंदकुमार लोखंडे, भारत तमनर आदींनी यशस्वी पार पाडली.
