Latest Post

क्रीडा शिबिराचे परितोषिक वितरण समारंभ,श्रीरामपूर : विद्यार्थी दशेत प्रत्येकानेच एक ध्येय निश्चित केल्यास त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केले.येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये दीपावलीच्या सुटीचा सदुपयोग म्हणून जी.एन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १५ दिवसीय दिवाळी क्रीडा शिबिर उत्साहात संपन्न झाले.शिबिराच्या समारोप प्रसंगी बोरसे बोलत होते.अध्यक्षस्थानी सार्थक संस्थेचे सचिव शकील बागवान होते.जीवन बोरसे पुढे म्हणाले,अगदी प्रारंभीच्या काळातच आपल्याला परिपूर्ण प्रशिक्षण मिळाले तर भविष्यात त्या त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविता

येते.पंधरा दिवसीय शिबिरामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.व्हॉलीबॉल, क्रिकेट,रोल बॉल,बास्केटबॉल,स्केटिंग या खेळांच्या प्रशिक्षणाचा समावेश होता.या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक खेळाशी संबधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवून दिले. आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंना सार्थक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह सार्थक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री शकील बागवान,जय हिंद करिअर अकॅडमी चे सुयोग सास्कर, सार्थकचे अध्यक्ष उमेश तांबडे, क्रीडा शिबिराचे आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शकील बागवान यांचेही भाषण झाले. पंधरा दिवसीय शिबिरामध्ये दरदिवशी विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विविध क्षेत्रातील सर्वोत्तम मान्यवरांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.यामध्ये अजय घोगरे (अभिनय व सांस्कृतिक क्षेत्र),सुजाता शेंडगे (प्राणायाम), महेश कोल्हे (कब्बडी), बॉबी बकाल (क्रिकेट), डॉ अमित मकवणा (आहार व खेळातील इजा ), प्रवीण जमदाडे ( मोटिवेशनल ), जयेश सावंत (पत्रकारिता), जतिन सोलंकी (योगा), प्रवीण कुदळे (मर्दानी खेळ), सुयोग सासकर (आर्मी भरती), अभिषेक अन्सिंगकर (अकाउंटिंग) आदींचा समावेश होता.

अहमदनगर प्रतिनिधी- शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल अनिल कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार दिनांक 04/11/2022 रोजी  श्री. निखील बाळासाहेब वाघ, वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगांव, ता. श्रीरामपूर हे रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी चार इसमांनी घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवुन साक्षीदारांना कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी करुन घरातील सामानाची उचका पाचक करुन 2,71,000/- हजार रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घेवुन गेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. राकेशजी ओला साहेब पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने लावून शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री.अनिल जी कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार करताना बाळासाहेब पटारे, पंढरीनाथ वाघ,आनंद वाघ, शिवाजी दौंड ,नवनाथ वाघ, शरद वाघ, शुभम वाघ, निखिल वाघ, सुनील पटारे आदी उपस्थित होते.





बेलापुर  (प्रतिनिधी  )- सालाबाद प्रमाणे या ही वर्षी  गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या वतीने  गौसे आजम दरगाह उरुस मोठ्या उत्सहात संपन्न  झाला या वेळी  वाजत गाजत चादरची मिरवणुक काढण्यात आली त्या नंतर   महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी दरगाहची भव्य सजावट देखील करण्यात आली होती  या वेळी  ग्रामपंचायत  सदस्य शफीकभाई बागवान मुस्ताक शेख ,हाजी इस्माइलभाई शेख, मोहसिनभाई सय्यद,जब्बार अत्तार,वरिष्ठ पत्रकार देवीदास देसाई, हाजी मंसूरभाई सय्यद,रफीकभाई शाह, गौसेआजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख़्तार सय्यद,अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, मुयूर मोरे, सिराज अत्तार, इराफन अत्तार, सना काज़ी, शौकत कुरैशी,जीनाभाई शेख व इतर कार्यकर्ते  यांनी  कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर प्रतीनिधी- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मधील कृषी मंत्री अब्दूल सत्तर यांनी, टीका करतांना दिल्या शिवी, तसेच  संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वापलेल्या अपशब्दामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असुन. राज्यभरात अब्दूल सत्तर यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दूल सत्तर यांच्या थोडी लाज शिल्लक असेल तर त्यांनी, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन, राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केलं आहे. सदरच्या आंदोलनास शहरातील महिला भागणींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या धाडसी कर्तबगारीमुळे त्यांचा कार्यकाळात कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीवर मोठा वचक बसलेला असल्याने तथा श्रीरामपूर विभागातील त्यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल पुर्ण होत असल्याने अन्य ठिकाणी त्यांच्या बदलीची चर्चा होत असुन शासनाने त्यांची अन्यत्र बदली न करता श्रीरामपूर विभागातच आणखी त्यांना शासकीय सेवेचा कार्यकाल वाढून द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल निवेदन पत्राद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांची कामे ही खुपच चांगली आणि पारदर्शकता ठेवणारी आहे, कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणारी आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी आहे,करीता त्यांना श्रीरामपूर विभागातच आपल्या सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळावा कारण ऐकेकाळी श्रीरामपूर शहर व परिसर हे गुन्हेगारीचे गड मानली जात असे, मात्र श्री. मिटके साहेबांनी अनेक गुन्हेगारांना योग्य धडा शिकवत त्यांना वठणीवर आणले आहे, म्हणून त्यांची अन्यत्र बदली न करता त्यांच्या शासकीय सेवा कार्याचा कार्यकाल याच ठिकाणी वाढून देत याठिकाणीच त्यांना कार्यरत ठेवण्यात यावे,अन्यत्र कोणत्याही ठिकाणी त्यांची बदली करु नये असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रति पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलिस उपमहानिरीक्षक नाशिक,जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस प्रमुख अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. आबु असिम आझमी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी- शहरातील वार्ड नंबर ३, येथील शिवसर्कल याठिकाणी. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी, आयलॅंड विकसित करण्याच्या नावाखाली पालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी.एकाच कामाचे दोन वेळा निविदा काढुन. आयलॅंडच्या कामात केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात, श्रीरामपूर नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,याकरिता यापूर्वी पुरावे देऊन. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी,घेराव,उपोषण,बैठा सत्याग्रह  यासारखे आंदोलन केल्यानंतर. कारवाईचे आश्वासन देऊनही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने. कुंभकर्णी झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी, श्रीरामपूर नगरपालिके समोर ढोल बजाव आंदोलन केलंय. सदरच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक आशिष धनवटे,शशांक रासकर,सचिन गुजर, सुनील बोलके, आदींसह शहरातील नागरिक तसेच काँगेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी  )-येथील नवशा हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट उत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला बेलापुर बु!! येथील पेठेतील नवशा हनुमान हा भक्तांच्या नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिध्द आहे दररोज सकाळ पासुन सायंकाळ पर्यत भावीक या मंदीरात दर्शनासाठी येत असतात सालबाद प्रमाणे या ही वर्षी 56 भोग चे नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली त्या नंतर भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पाचशे , दोनशे, शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा तसेच दहा वीस रुपयांच्या  कोऱ्या करकरीत नोटांनी नवशा हनुमान मूर्तीची सुंदर पध्दतीने सजावट करण्यात आली  तसेच फुल पुष्पहार माळांनी व विद्युत रोषणाईने श्री नवशा हनुमान मूर्तीला मनमोहाक असे रुप प्राप्त झाले होते ही सजावट पाहू अनेक हनुमान भक्तांनी या सजावटी करणाऱ्यांचे मन भरुन कौतुक केले पाच  मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव संपन्न झाला सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश दायमा सौ स्नेहल दायमा तसेच मुकुंद चिंतामणी यांनी विशेष परिश्रम घेतले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget