आयलॅंड भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी, छल्लारेंचे ढोल बजाव आंदोलन.
श्रीरामपूर प्रतिनिधी- शहरातील वार्ड नंबर ३, येथील शिवसर्कल याठिकाणी. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी, आयलॅंड विकसित करण्याच्या नावाखाली पालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी.एकाच कामाचे दोन वेळा निविदा काढुन. आयलॅंडच्या कामात केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात, श्रीरामपूर नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,याकरिता यापूर्वी पुरावे देऊन. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी,घेराव,उपोषण,बैठा सत्याग्रह यासारखे आंदोलन केल्यानंतर. कारवाईचे आश्वासन देऊनही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने. कुंभकर्णी झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी, श्रीरामपूर नगरपालिके समोर ढोल बजाव आंदोलन केलंय. सदरच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक आशिष धनवटे,शशांक रासकर,सचिन गुजर, सुनील बोलके, आदींसह शहरातील नागरिक तसेच काँगेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment