नवशा हनुमान मंदीरात अन्नकोट उत्सव संपन्न
बेलापूर (प्रतिनिधी )-येथील नवशा हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट उत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला बेलापुर बु!! येथील पेठेतील नवशा हनुमान हा भक्तांच्या नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिध्द आहे दररोज सकाळ पासुन सायंकाळ पर्यत भावीक या मंदीरात दर्शनासाठी येत असतात सालबाद प्रमाणे या ही वर्षी 56 भोग चे नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली त्या नंतर भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पाचशे , दोनशे, शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा तसेच दहा वीस रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांनी नवशा हनुमान मूर्तीची सुंदर पध्दतीने सजावट करण्यात आली तसेच फुल पुष्पहार माळांनी व विद्युत रोषणाईने श्री नवशा हनुमान मूर्तीला मनमोहाक असे रुप प्राप्त झाले होते ही सजावट पाहू अनेक हनुमान भक्तांनी या सजावटी करणाऱ्यांचे मन भरुन कौतुक केले पाच मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव संपन्न झाला सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश दायमा सौ स्नेहल दायमा तसेच मुकुंद चिंतामणी यांनी विशेष परिश्रम घेतले
Post a Comment