.
ग्रामपंचायत सरपंच कडूनच कामासंदर्भात तक्रार निकृष्ट शौचालयाच्या कामाच्या चौकशी करिता न्यायालयात जाणार-सौ.महाडीक.
बेलापूर प्रतिनिधी-स्त्री - पुरुष समानता राहावी. याकरिता राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे अनेक महिला उच्च पदस्थांनी बसल्या आहेत. मात्र महिलांवर दबाव आणून, त्यांच्या कामात अडथळे ,तसेच नामधारी करून दुसरेच निर्णय घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात ५ हजार लोकवस्तीच्या, बेलापूर खुर्द ग्रामपंचातीत समोर आला आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने,सौ वर्षा महाडिक ह्या बहुमताने पदस्त झाल्या. परंतु नामधारी सरपंच करून, होत असलेल्या भ्रष्टाचार सहन न झाल्याने. जनतेला दिलेले वाचनासाठी, स्वतः महिला सरपंच सौ महाडिक यांनी,पितळ उघडे केलं आहे. अनेक वेळा विरोध करूनही, पाऊने ५ लाख रुपये खर्च करून. ग्रामपंचायतिच्या मागील बाजूस बांधण्यात आलेले शौचालायात ना पाण्याची सोय,ना प्रशस्त टाळी, त्यामुळे बंद असवस्थेतीत शौचालयाचा, ग्रामस्थांना वापर करता येत नसल्याने. ग्रामस्थ देखील संताप व्यक्त करीत असून. शौचालय सुरू करा नाहीतर पाडून तरी टाका अशी मागणी करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या,शौचालयाच्या निकृष्ठ कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. याकरिता महिला सरपंच सौ महाडिक आता, न्यायालयाचा दरवाजा ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.
Post a Comment