श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे स्वागत.
श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर, जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच पोलीस कारवाईचा आढावा घेण्यासाठी. पोलीस अधीक्षक राकेश ओला विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यावेळी श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने, पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे स्वागत करण्यात आले. सदरच्या स्वागत कार्यक्रमा प्रसंगी तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद,एस न्यूज मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत, न्यूज सुपर वन चे अभिषेक सोनवणे उपस्थितीत होते. सदरच्या स्नेह भेटी वेळी झालेल्या चर्चे दरम्यान, श्रीरामपूर येथील जुन्या आठवणींना उजाळा देत. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी देखील उपस्थित होते.
Post a Comment