अहमदनगर प्रतिनिधी-अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांची पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये बदली झाली. त्यांच्या जागेवर सुहास मापारी यांची नियुक्ती झाली आहे. मापारी यांनी यापूर्वी महसूल उपजिल्हाधिकारी तसेच श्रीरामपूरला प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर हे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते.यमगर हे पुणे जिल्ह्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली नव्हती. यमगर नगर येथे एक वर्षभर कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. शेवगाव तालुक्यातील बनावट बिगरशेती प्रकरणाचा तपास केला होता. सुहास मापारी हे नगरला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूरचे प्रांताधिकारी म्हणून झाली. मापारी यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Post a Comment