Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी- शहरातील वार्ड नंबर ३, येथील शिवसर्कल याठिकाणी. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी, आयलॅंड विकसित करण्याच्या नावाखाली पालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी.एकाच कामाचे दोन वेळा निविदा काढुन. आयलॅंडच्या कामात केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात, श्रीरामपूर नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,याकरिता यापूर्वी पुरावे देऊन. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी,घेराव,उपोषण,बैठा सत्याग्रह  यासारखे आंदोलन केल्यानंतर. कारवाईचे आश्वासन देऊनही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने. कुंभकर्णी झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी, श्रीरामपूर नगरपालिके समोर ढोल बजाव आंदोलन केलंय. सदरच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक आशिष धनवटे,शशांक रासकर,सचिन गुजर, सुनील बोलके, आदींसह शहरातील नागरिक तसेच काँगेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी  )-येथील नवशा हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट उत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला बेलापुर बु!! येथील पेठेतील नवशा हनुमान हा भक्तांच्या नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिध्द आहे दररोज सकाळ पासुन सायंकाळ पर्यत भावीक या मंदीरात दर्शनासाठी येत असतात सालबाद प्रमाणे या ही वर्षी 56 भोग चे नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली त्या नंतर भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पाचशे , दोनशे, शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा तसेच दहा वीस रुपयांच्या  कोऱ्या करकरीत नोटांनी नवशा हनुमान मूर्तीची सुंदर पध्दतीने सजावट करण्यात आली  तसेच फुल पुष्पहार माळांनी व विद्युत रोषणाईने श्री नवशा हनुमान मूर्तीला मनमोहाक असे रुप प्राप्त झाले होते ही सजावट पाहू अनेक हनुमान भक्तांनी या सजावटी करणाऱ्यांचे मन भरुन कौतुक केले पाच  मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव संपन्न झाला सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश दायमा सौ स्नेहल दायमा तसेच मुकुंद चिंतामणी यांनी विशेष परिश्रम घेतले

बेलापूर प्रतिनिधी-स्त्री - पुरुष समानता राहावी. याकरिता राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे अनेक महिला उच्च पदस्थांनी बसल्या आहेत. मात्र महिलांवर दबाव आणून, त्यांच्या कामात अडथळे ,तसेच नामधारी करून दुसरेच निर्णय घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात ५ हजार लोकवस्तीच्या, बेलापूर खुर्द ग्रामपंचातीत समोर आला आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने,सौ वर्षा महाडिक ह्या बहुमताने पदस्त झाल्या. परंतु नामधारी सरपंच करून, होत असलेल्या भ्रष्टाचार सहन न झाल्याने. जनतेला दिलेले वाचनासाठी, स्वतः महिला सरपंच सौ महाडिक यांनी,पितळ उघडे केलं आहे.  अनेक वेळा विरोध करूनही, पाऊने ५ लाख रुपये खर्च करून. ग्रामपंचायतिच्या मागील बाजूस बांधण्यात आलेले शौचालायात ना पाण्याची सोय,ना प्रशस्त टाळी, त्यामुळे बंद असवस्थेतीत शौचालयाचा, ग्रामस्थांना वापर करता येत नसल्याने. ग्रामस्थ देखील संताप व्यक्त करीत असून. शौचालय सुरू करा नाहीतर पाडून तरी टाका अशी मागणी करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या,शौचालयाच्या निकृष्ठ कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. याकरिता महिला सरपंच सौ महाडिक आता, न्यायालयाचा दरवाजा ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.







.

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर, जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच पोलीस कारवाईचा आढावा घेण्यासाठी. पोलीस अधीक्षक राकेश ओला विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यावेळी श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने, पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे स्वागत करण्यात आले. सदरच्या स्वागत कार्यक्रमा प्रसंगी तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद,एस न्यूज मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत, न्यूज सुपर वन चे अभिषेक सोनवणे  उपस्थितीत होते. सदरच्या स्नेह भेटी वेळी झालेल्या चर्चे दरम्यान, श्रीरामपूर येथील जुन्या आठवणींना उजाळा देत. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी देखील उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांची पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये बदली झाली. त्यांच्या जागेवर सुहास मापारी यांची नियुक्ती झाली आहे. मापारी यांनी यापूर्वी महसूल उपजिल्हाधिकारी तसेच श्रीरामपूरला प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर हे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते.यमगर हे पुणे जिल्ह्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली नव्हती. यमगर नगर येथे एक वर्षभर कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. शेवगाव तालुक्यातील बनावट बिगरशेती प्रकरणाचा तपास केला होता. सुहास मापारी हे नगरला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूरचे प्रांताधिकारी म्हणून झाली. मापारी यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 भागामध्ये असणाऱ्या उत्सव मंगल कार्यालयापुढे पूर्वेला १०० मीटर वर रोड जवळील चर/ओढ्याच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये आज शुक्रवारी सकाळी -सकाळी एका महिलेची अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील डेड बॉडी सापडली.येथे फिरायला येणाऱ्या काही नागरिकांना हे प्रेत तरंगतांना दिसले.  त्यानुसार त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना संपर्क केला आहे.यावर्षी पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत.ही देखील विहीर तुडुंब भरल्यामुळे विहिरीत विविध प्रकारची घाण ,कचरा गोळा झाला आहे.तरंगलेल्या या कचऱ्यातच ही महिलेची डेड बॉडी आज सकाळी दिसून आली.सदर मयत महिलेचे वय साधारण 40 ते 45 असल्याचे दिसून येत होते.हि महिला नेमकी कोण?या महिलेने आत्महत्या केली ?की हा घातपाताचा प्रकार आहे ? याबाबी लवकरच पोलीस तपासात स्पष्ट होतील.

श्रीरामपूर : विद्यार्थ्यांची शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी, क्रीडा प्रशिक्षक नितीन बलराज, गौरव डेंगळे, नितीन गायधने यांनी, दिवाळीच्या सुट्टी निमित्त. शहरातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी. १५ दिवसांचे मैदानी  क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून. या क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून, तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना. तालुका पातळी पासून, देश पातळीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. खेळा प्रमाणेच विद्यार्थ्यांना सामजिक, कला-क्रिडा, संस्कृती यासह विविध क्षेत्राचे ज्ञान व्हावे या उद्देशाने, विविध मान्यवरांना बोलावून मार्गदर्शन देखील केले जात आहे. ज्यात गेल्या १० दिवसात, योग प्रशिक्षक सुजाता शेडगे, आहार व स्पोर्ट इंज्युरी संदर्भात डॉ अमीत मकवना, कबड्डी विषयावर महेश कोल्हे, प्रोत्साहणात्मक विषयावर प्रवीण जमधाडे, तर शिबिराच्या १० व्या दिवशी  पत्रकार जयेश सावंत यांनी, क्रीडा पत्रकारिता व करिअर यासंदर्भात मार्गदर्शन करतांना. विद्यार्थ्यांनी एकाग्रता आत्मसाद केल्यास, जीवनात कोणतेही लक्ष साधता येते, विद्यार्थी दशा ही मातीच्या गोळ्या प्रमाणे असते ,याच वयात त्यांना आकार देऊन मुलांवर संस्कार घडविले जातात. भविष्यात समाजात चांगला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी, आपण आपल्या पालकांसह शिक्षकांचा आदर केला तर, आपल्या जीवनात, संस्कार आणि आत्मविश्वासाचे कवच निर्माण होईल. याकरिता विद्यार्थी जिद्द आणि एकाग्रतेने शिक्षणासह,क्रीडा आणि कुटूंबातील जबाबदारी पार पाडावी असे आवाहन पत्रकार सावंत यांनी विद्यार्थ्यांना करून. क्रीडा शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.  दिवाळी सुट्टी निमित्त आयोजित १५ दिवसांच्या क्रिडा शिबिरात,रोलबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल,स्केटिंग व क्रिकेट या खेळाचे प्रशिक्षण दिले जात असून. क्रीडा प्रशिक्षक नितीन बलराज, गौरव डेंगळे, नितीन गायधने यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे,भविष्यात श्रीरामपूरातून अनेक खेळाडू राज्य तसेच देश पातळीवर आपले व शहराचे नाव चमकवून, उज्वल भविष्य घडवतील असा विश्वास पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget