एकाग्रतेसह थोरा मोठयांचा आदर केल्यास कोणतेही क्षेत्र अशक्य नाही - सावंत.
श्रीरामपूर : विद्यार्थ्यांची शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी, क्रीडा प्रशिक्षक नितीन बलराज, गौरव डेंगळे, नितीन गायधने यांनी, दिवाळीच्या सुट्टी निमित्त. शहरातील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी. १५ दिवसांचे मैदानी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून. या क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून, तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना. तालुका पातळी पासून, देश पातळीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. खेळा प्रमाणेच विद्यार्थ्यांना सामजिक, कला-क्रिडा, संस्कृती यासह विविध क्षेत्राचे ज्ञान व्हावे या उद्देशाने, विविध मान्यवरांना बोलावून मार्गदर्शन देखील केले जात आहे. ज्यात गेल्या १० दिवसात, योग प्रशिक्षक सुजाता शेडगे, आहार व स्पोर्ट इंज्युरी संदर्भात डॉ अमीत मकवना, कबड्डी विषयावर महेश कोल्हे, प्रोत्साहणात्मक विषयावर प्रवीण जमधाडे, तर शिबिराच्या १० व्या दिवशी पत्रकार जयेश सावंत यांनी, क्रीडा पत्रकारिता व करिअर यासंदर्भात मार्गदर्शन करतांना. विद्यार्थ्यांनी एकाग्रता आत्मसाद केल्यास, जीवनात कोणतेही लक्ष साधता येते, विद्यार्थी दशा ही मातीच्या गोळ्या प्रमाणे असते ,याच वयात त्यांना आकार देऊन मुलांवर संस्कार घडविले जातात. भविष्यात समाजात चांगला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी, आपण आपल्या पालकांसह शिक्षकांचा आदर केला तर, आपल्या जीवनात, संस्कार आणि आत्मविश्वासाचे कवच निर्माण होईल. याकरिता विद्यार्थी जिद्द आणि एकाग्रतेने शिक्षणासह,क्रीडा आणि कुटूंबातील जबाबदारी पार पाडावी असे आवाहन पत्रकार सावंत यांनी विद्यार्थ्यांना करून. क्रीडा शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. दिवाळी सुट्टी निमित्त आयोजित १५ दिवसांच्या क्रिडा शिबिरात,रोलबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल,स्केटिंग व क्रिकेट या खेळाचे प्रशिक्षण दिले जात असून. क्रीडा प्रशिक्षक नितीन बलराज, गौरव डेंगळे, नितीन गायधने यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे,भविष्यात श्रीरामपूरातून अनेक खेळाडू राज्य तसेच देश पातळीवर आपले व शहराचे नाव चमकवून, उज्वल भविष्य घडवतील असा विश्वास पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे.
Post a Comment