Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील एका अल्पवयीन मुलीची त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने वर्गात जावून छेड काढल्या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने शाळेत जाऊन धरणे आंदोलन केले.श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र तो पर्यंत चितळी स्टेशन परिसरातील व्यापारी वर्गानी आपले दुकाने बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच चितळी गाव व स्टेशन परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने फोफावलेले अवैध धंदे या घटनेला कारणीभूत ठरत असल्याचे चर्चा दिवस भर गावात रंगली होती.सविस्तर माहिती अशी की, चितळी (ता.राहाता) येथील हायस्कुल मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा अल्पवयीन आरोपीने दहावीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या वर्गात जावून तिची छेड काढली. झालेल्या प्रकाराने ही विदयार्थी घाबरून गेली, झालेला प्रकार घरी समजल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान या घडलेल्या घटनेचा निषेध व आरोपीने चार दिवसा पूर्वी शाळेत दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीशी गैर वर्तन केले होते. त्यामुळे त्यास शाळेतून काढून टाकावे व लवकरात लवकर अटक करून कारवाई होण्याकरिता परिसरातील जळगाव, एलमवाडी, धनगरवाडी तसेच परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेच्या प्रागणात जमा झाले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पो.नि. शिंदे, सहाय्यक पो.नि.अमृत बोरसे यांनी निवेदन स्वीकारून शाळेच्या वेळेत पेट्रोलिंग करून कायमस्वरूपी पोलीस दूरक्षेत्रासाठी कर्मचारी नेमणूक करण्याचे आश्वासन दिले.

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी  शहरातील हॉटेल,लॉजमध्ये जर वेश्या व्यवसाय चालत असेल तर त्यावर तातडीने कारवाई करून सदरचे हॉटेल, लॉजींग सिल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले असून भाविकांना छळणार्‍या पॉलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी शिर्डी शहरातील हॉटेल लॉजींग मालक चालक यांची बैठक बुधवारी पोलीस स्टेशनसमोरील मॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, सहा पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती कोकाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रत्येकाचे मत ऐकून घेतले. यानंतर श्री. पाटील यांनी सांगितले की, येथील हॉटेल इंडस्ट्रीजचे मालक चालक यांचे नुकसान व्हावे अशी आमची इच्छा नाही. या ठिकाणी येणारा भाविक सुरक्षीत असायला हवा. जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव कलम 144 लागू करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या पर्यटकांची ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. विमानाने शिर्डीत येणार्‍या भाविकांचे रेकॉर्ड तपासणे गरजेचे आहे. भाविकांना चुकीच्या सेवा दिल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉटेल तसेच लॉजमध्ये काम करणार्‍या कामगारांचे देखील ओळखपत्र किंवा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला घ्यावेत. हॉटेलमध्ये इंटरनेटद्वारे देण्यात येणारी अनसिक्युअर वायफाय सेवा सिक्युअर करण्यात यावी.परदेशी पर्यटकांचे प्रत्येक हॉटेलमध्ये सी फार्म भरुन घेणे क्रमप्राप्त असून परदेशी पर्यटकांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. परदेशी पर्यटकांच्या निवासासाठी शिर्डी शहरात अद्यापपर्यंत फक्त चोवीस हॉटेलला मान्यता देण्यात आली आहे. ज्यांना सी फार्म बाबत माहिती हवी असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा. मुदतबाह्य तसेच व्हिसा संपलेल्या नागरिकांना बिलकुल थारा देऊ नये.प्रत्येक हॉटेल, लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. येणार्‍या भाविकांना तसेच लोकांना त्रास देणार्‍या पॉलीशीवाल्यांवर तसेच वेळप्रसंगी हॉटेल मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल याची गांभीर्याने दक्षता घ्यावी. यासंदर्भात पोलीसांना सक्त सुचनाही देण्यात आल्या आहेत.भाविकांना छळणार्‍या पॉलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे.शहरातील रिक्षावाल्यांचे रेकॉर्ड तसेच वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात यावी, असेही शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक यांना आदेश देण्यात आले. घरमालकांनी भाडेकरुंना भाड्याने घर देताना भाडेकरूंची सर्व माहिती घेऊन पोलीस ठाण्यात द्यावी. सायबर कॅफे चालक-मालक यांनी येणार्‍या ग्राहकांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यासाठी वापर करू देऊ नये. शिर्डी शहरात सदरची कारवाई निरंतर चालू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरात गांजा, दारू, नशेची पदार्थांचे विक्री तसेच अवैध धंदे याबाबत माहिती देणार्‍यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही उपविभागीय अधिकारी सातव यांनी सांगितले.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-बेलापूर बुll  ग्रामपंचायतीच्या शताब्दीवर्षा निमित्त आदर्श ग्राम समितीचे सदस्य तसेच पाटोदा या राज्यातील ख्यातीप्राप्त गावाचे सरपंच भास्करराव पेरे यांचे "गाव सेवा हिच ईश्वर सेवा"या विषयावर गुरुवार(ता.८)रोजी सायं.६ वा. व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शताब्दीपूर्ती निमित्त ग्रामापंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रम अंतर्गत गुरुवार ता.८ सप्टेंबर रोजी सायं ६ वा. पाटोदा(ता.जि.औरंगाबाद )येथील राज्यातील ख्यातनाम आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या व्याख्यानाचे आजाद मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.                                                           श्री.भास्करराव पेरे यांना आदर्श सरपंच म्हणून  राज्य शासनाचे तसेच डाॕ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.श्री.पेरे यांनी पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यातील आदर्श गाव असा लौकिक मिळवून दिला आहे.पाटोदा गावाला केन्द्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार ,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार ,केन्द्र शासनाचा पंचायत राज सबलीकरण आदिसह अनेक राज्यस्तरिय पुरस्कार मिळाले आहेत.श्री.पेरे हे राज्यभर ग्रामविकासाबाबत व्याख्याने देवून जनजागृती करतात.तरी ग्रामस्थांनी श्री.भास्करराव पेरे यांचे   व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच श्री.साळवी,उपसरपंच श्री.खंडागळे ,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी )- गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये या करीता अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी बेलापुर येथील प्रवरा नदीवरील गणपती विसर्जन जागेची पहाणी करुन बेलापुर ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचा योग्य त्या सुचना दिल्या , बेलापूरात एकुण सोळा गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असुन सर्व गणेश मंडळ गणेश विसर्जन हे बेलापूर नदीवरील पुलाजवळच करत असतात तसेच प्रवरा नदीला पाणी असल्यामुळे श्रीरामपुर येथील गणेश मंडळेही गणपती विसर्जन करण्याकरीता बेलापुरला येतात त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपुरच्या पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत गणेश विसर्जन स्थळाला भेट दिली. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी गणेश विसर्जन नियोजनाबाबत  माहीती दिली या वेळी आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करा बँरेकेट़्स लावा सीसीटीव्ही कँमेरे बसवा गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी संबधीतांना दिल्या .गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोहणाऱ्या तरुणांची टिमही तयार ठेवण्यात आली असुन तीच मुले नदी पात्रात जावुन गणेश विसर्जन करतात इतरांना खोल पाण्यात जावु दिले जात नाही तसेच या ठिकाणी बँरेकेट़्स तसेच ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले   या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे हवालदार अतुल लोटके हरिष पानसंबळ पत्रकार देविदास देसाई,ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक,विशाल आंबेकर  तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, दै.जय बाबा व विठ्ठल प्रभा वर्तमानपत्राचे संस्थापक,भारत सरकार नोटरी,ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे यांचे आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०८:४५ वा वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४:००वा  अमरधाम,श्रीरामपूर येथे होईल.

- अंत्ययात्रा सप्तश्रृंगी निवास,बजरंगनगर,बेलापूर रोड,वार्ड नं-०७,श्रीरामपूर येथुन निघेल.

बेलापुर  ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या टाकळीभान ग्रामपंचायतीचे एकाच वेळेस दहा सदस्य अपात्र ठरविण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असुन घुमनदेव नंतर टाकळीभानचे सदस्य  अपात्र झाले असुन आता तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे              घुमनदेव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे अपात्र झाल्यानंतर आता राजकिय प्रतिष्ठा असलेल्या व नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणाने ग्रामपंचायत आधिनियमातील तरतुदी नुसार सदस्यपदी रहाण्यास अपाञ ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एवढीमोठी कारवाई झाल्याने व सरपंच व उपसरपंच एकाच वेळी अपाञ झाल्याने ग्रामपंचायत कामकाजाचा गुंता वाढल्याने पुन्हा प्रशासकिय राज सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.

           टाकळीभान ग्रामपंचायतीची १८ जानेवारी २०२१ ला मोठी चुरशीची निवडणुक झाली होती. जिल्हाभर या निवडणुकिची चर्चा रंगली होती.  माजी सभापती नानासाहेब पवार यांची एकहाती सत्ता मतदारांनी उलथुन टाकत निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या तरुण उमेद्वारांच्या बाजुने  कौल देत १७ पैकी १६ सदस्य विजयी करुन एकहाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. महाविकास आघाडीत माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने सरपंच व उपसरपंच निवडीत मुरकुटे गटाने बाजी मारली होती  माञ मुरकुटे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना व स्थानिक गावपुढार्यांना हा आनंद फार काळ पचवता आला आला नाही. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत कारभारात अंतर्गत धुसफुस सुरु झाल्याने कलह वाढत गेला.

           नुकत्याच निवडुन आलेल्या १० ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ ( १ )( ज - ३ ) व १६ प्रमाणे या सदस्यांची झालेली निवड बेकायदेशिर असल्याने त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपाञ झाले आहे टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण  केले असुन त्याचे सदस्यपद रद्द करावे असा विवाद अर्ज २९ जुन २०२१ रोजी जेष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी प्रभाग १ च्या सदस्या सविता पोपट बनकर, प्रभाग २ चे अशोक लालचंद कचे, सुनिल तुकाराम बोडखे व लता भाऊसाहेब पटारे, प्रभाग ३ चे संतोष अशोक खंडागळे व अर्चना शिवाजी पवार, प्रभाग ४ चे सरपंच अर्चना यशवंत रणनवरे व कल्पना जयकर मगर, प्रभाग ५ च्या कालिंदा बाबासाहेब गायकवाड व दिपाली सचिन खंडागळे यांच्या विरोधात विवाद अर्ज अहमदनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केला होता.

      या दाखल विवाद अर्जाची वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात घेण्यात आली. गटविकास आधिकारी श्रीरामपुर यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करुन जिल्हाधिकारी यांना आहवाल सादर केला होता. या सर्व पुराव्यांच्या कागदपञांची पडताळणी करुन जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार राधाकृष्ण वाघुले यांचा विवाद आर्ज मंजुर करत वरील पैकि १० सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास आपाञ ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे लेखी आदेश दिले आहेत. तर विभागिय आयुक्तांकडे अपिलासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

         या निर्णयामुळे सतरा सदस्य आसलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचासह १० सदस्य आपाञ ठरवले गेल्याने व त्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने  केवळ ७ सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सदस्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने व आर्थिक व्यवहार ठप्प होणार आसल्याने ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ति होवुन प्रशासकिय राज सुरु होणार का ? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याने सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहाणार्या सदस्यांचे धाबे दणानले आहे. जिल्हाधिकारी यांच्या या निकालामुळे विरोधी गटात माञ खुशी निर्माण झाली आहे.

 जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक २ व ३ चे सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने हे दोन्ही प्रभाग पोरके झाले आहेत तर प्रभाग ४ मधील सरपंचासह दोन महीला, प्रभाग १ मधील एक महीला तर प्रभाग ४ मधील दोनमहीला आपाञ झाल्या आहेत. प्रभाग ६ माञ सुरक्षित राहीला आहे. या १० सदस्यांच्या अपाञञेत ७ महीला सदस्य अपाञ ठरल्या आहेत. सभासदत्व रद्द झालेल्या दहा सदस्यांनी निवडणुकित प्रतिज्ञा पञ सादर करताना चुकिची माहीती देवुन शासनाची फसवणुक केलेली असल्यामुळे हे सदस्य अपात्र करावेत अशी मागणी शिवसेनेचे राधाकृष्ण वाघुले यांनी केली होती

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुरातील एक तरूणी 40 दिवसांपासून बेपत्ता असूनही तिचा तपास लागला नाही. हा ‘लव जिहाद’चाच प्रकार असल्याने या प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने तसेच समस्त हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. येत्या 4 दिवसात जर सदर आरोपीचा तपास लागला नाही तर शहरातील व्यापार्‍यांशी चर्चा करून श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पेालीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी दिला आहे.

एका कॉलेज तरूण मुलीला मुस्लिम समाजाच्या एका तरूणाने पळवून नेलेले आहे परंतू, पोलीस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकार हा लव जिहादचा असल्याने सदर तरूणाचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकदा निवेदनं दिले परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज या प्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने तरूण सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरात लव जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटूंबीय पोलीसांकडे निवेदन देवून मागणी करते. त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो तर आम्हालाच उलट नोटीसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का? अशाप्रकारे न्याय मागणार्‍यांना नोटीसा देवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न  केल्यास भविष्यात कोणी कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणार नाही. हे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे, असे सांगत सूरजभाई आगे म्हणाले, येत्या 4 दिवसात जर सदर प्रकरणाचा तपास न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून श्रीरामपूर बंद बाबतचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी सांगितले. यावेळी पोनि. हर्षवर्धन गवळी, सपोनि. बोर्से यांना मागणीचे रितसर निवेदन देण्यात आले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget