Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-बाभळेश्वर येथील विवाहितेचा रांजणखोल-खंडाळा शिवारात प्रवरा कॅनॉलमध्ये काल रविवारी मृतदेह आढळून आला. सासरच्या लोकांकडून तिचा घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.वैशाली उर्फ कल्याणी धीरज पाटोळकर (वय 34) असे या विवाहितेचे नाव आहे. काल रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडाळा- रांजणखोल रोड येथील अचानकनगर भागात प्रवरा कॅनॉल मधील पुलाला अडकलेल्या अवस्थेत हिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.खंडाळा-रांजणखोल शिवारात पाटाच्या पुलाला महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी रांजणखोलचे पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली. त्यांनी ही माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. शेलार, रघुवीर कारखिले, श्री. बोरसे फौजफाट्यासह हजर झाले. यावेळी महिलेच्या पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी तिचेे वडील व भाऊ यांनी केली.श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती येथील तिचे माहेर असून सासर बाभळेश्वर येथील आहे. कल्याणी उर्फ वैशाली हिचा पती धीरज पाटोळकर याचे तिच्यासोबत अनेकदा वाद होत होते. या वादातून पती धीरज पाटोळकर हा वैशाली हिला मारहाण करून तिचा राग करत होता. त्यामुळेच वैशाली हिचा पतीकडून घातपात झाला असावा, असा आरोप वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दुपारी या विवाहितेवर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देताच अहमदनगर शहराचे पोलीस उपअधीक्षक यांचे पथक, एलसीबी आणि तोफखाना पोलिसांनी शुक्रवार, शनिवार हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई केली.उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने माळीवाडा वेस ते इम्पिरिअल चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. रोख रकमेसह 32 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार चालविणारे रोहित रवींद्र कदम आणि आकाश प्रकाश कदम (दोघे रा. माळीवाडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.बागडपट्टी येथे तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. 18 हजार 360 रुपयांची रोकड हस्तगत केली. दिलीप एकनाथ जाधव, गणेश प्रल्हाद चोभे, संजीव रामचंद्र राऊत, अमित अनिल कुमार, बिलाल मन्सुर शेख आणि मंगेश बाळासाहेब फुलसौंदर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीच्या पथकाने 16 तोटी कारंजा येथे अड्ड्यांवर कारवाई केली. आकाश बाबासाहेब ठोंबरे (वय 30 रा. वारूळाचा मारूती) आणि रितेश दिलीप लसगरे (वय 30 रा. मोची गल्ली) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नेप्ती नाका परिसरातील गणपती कारखान्याच्या मागे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करत चार हजार रुपयांची दारू नष्ट केली. याप्रकरणी कैलास संजय निकम (वय 28 रा. नेप्ती नाका) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक चाळ, रेल्वेस्टेशन येथील हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर एलसीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत साडेतीन हजारांची दारू नष्ट करण्यात आली. राजू खंडू आठवले (वय 45, रा. सारसनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामवाडी, बोल्हेगावातील संभाजीनगर आणि कोंड्यामामा चौकात सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या तीन अड्ड्यांमधील चार हजारांची दारू नष्ट करण्यात आली. हाशिर शहीद शेख (वय 65 रा. रामवाडी झोपडपट्टी), संजय नामदेव कांबळे (वय 44 रा. बोल्हेगाव) आणि करण अर्जुन साळुंके (वय 24 रा. मंगलगेट) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील कु-हे वस्ती भागामध्ये कमी दाबाने तसेच खंडीत वीज पुरवठा होत असल्याने नविन रोहिञ(डी.पी)बसवावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद दुधे यांचेकडे निवेदनाव्दारे केली. आहे                                  महावितरणला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर गावातील कु-हे वस्ती परिसरात असलेले रोहिञ ओव्हरलोड होते.यामुळे दाबनियमनात सातत्य राहात नाही.अनेकदा कमी दाबाने वीज पुरवठा होतो.यामुळे अनेकदा कृषीपंप जळतात.नियमीत दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पीकांना विहिरीस पाणी असून पाणी देता येत नाही.यामुळे पिकांचे नुकसान होते ,तसेच  वीज  नसल्याने वस्त्यांवरील लोकांना अंधारात राहावे लागते.यामुळे या परिसरात राञीच्यावेळी भितीचे वातावरण असते याकडे लक्ष वेधण्यात आले.त्यामुळे ह्या परिसरासठी नविन रोहिञ बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.                                याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले होते या वेळी,गोरक्षनाथ कु-हे,केदारनाथ कु-हे ,मधुकर अनाप,तान्हाजी कु-हे ,कारभारी भगत,केशव कु-हे ,विशाल आंबेकर,अशोक कु-हे ,बापुसहेब कु-हे ,विजय कु-हे ,सुनिल जाधव,महेश कु-हे ,अमोल कु-हे ,महेश भगवान कु-हे ,प्रकाश साळुंके ,आदित्य बिगरे,सागर धनसिंग ,अक्षय पवार आदि उपस्थित होते.


श्रीरामपूर : दिनांक २४ जून २०२२ रोजी, राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या भरारी पथकाने, नेवासा तालुक्यातील मुळा साखर कारखाना, सोनई,खडका,घोडेगाव व चांदा परिसरात, सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर  छापे टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पत्रक क्रमांक २ चे निरीक्षक, गोपाळ चांदेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी

उपअधीक्षक राज्य  उत्पादन शुल्क बी. बी. घोरतळ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ज्यात मुळा कारखाना, सोनई परिसर, खडका शिवार, घोडेगाव शिवार चांदा शिवार येथे छापेमारी करून. अवैध हातभट्टी अड्डे उधास्त करून. ५५० लिटर हातभट्टी दारू तैयार करण्याचे तयार रसायन, नष्ट करण्यात आले असून. खडका शिवारात अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह, देशी विदेशी दारूचा ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून. बाप्पु कोंडीराम गि-र्हे व विजय वसंत चावरे यांच्या विरुद्ध , मुंबई दारूबंदी कायदा १९४९ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक गोपाळ चांदेकर, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. आभाळे, दुय्यम निरीक्षक जी. एन. जायकोडी ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक, के. के. शेख, राज्य उत्पादन शुल्क विभागचे जवान प्रविण साळवे व महिला जवान सौ. स्वाती फटांगरे आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.

अहमदनगर प्रतिनिधी - जानेवारी २०२० पासून तपासात बेवारस दुचाकी पोलीसांना मिळून आल्या. त्या १३ दुचाकी मूळ मालकांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या हस्ते देण्यात आल्या.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना तपासा दरम्यान मिळून आलेल्या बेवारस वाहनांचे मुळमालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करुन स्थानिक गुन्हे शाखे कडील ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांचा शोध घेऊन व दुचाकी चोरीबाबत दाखल गुन्ह्यांची माहिती संकलीत करण्याबाबत तपास पथकास सूचना दिल्या होत्या.सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, विश्वास बेरड, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सचिन आडबल आदिंच्या पथकाने बेवारस दुचाकी मूळ मालकांचा शोध घेत असतांना पोनि श्री. कटके यांना बेवारस वाहनांची माहिती संकलीत केली. मुळ मालकापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करणारे विजय डिटेक्टीव्ह, (जि. कोल्हापुर) यांची माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी त्यांच्याशी संपर्क करुन तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे असलेल्या ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत घेतली.तपास पथकाने विशेष मेहनत घेऊन बेवारस दुचाकीचे अस्पष्ट झालेले चेसीज व इंजिन नंबर घेऊन कंपनीचे मुख्य कार्यालयाशी संपर्क करुन मूळ मालकांची नावे व पत्ते प्राप्त करुन त्यांच्याशी संपर्क केला. बेवारस दुचाकी मालक तेच आहेत, अशी खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे सादर करुन दुचाकी घेऊन जाण्याबाबत कळविले. दि. २१ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील ३८ बेवारस दुचाकी मालकां पैकी १३ मुळ मालकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे त्यांच्याकडील मुळ कागदपत्र हजर केले. विशेष पथकाने कागदपत्रांची शहनिशा व खात्री करुन एक दुचाकी आडगांव पोलीस ठाणे ( जि. नाशिक) येथील तपास अंमलदाराचे ताब्यात देऊन इतर १२ मुळ मालकांना स्थानिक गुन्हे शाखा पो.नि अनिल कटके यांच्या हस्ते बेवारस दुचाकी मुळमालकांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत.


अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत तायक्वांदो संघटना तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने १९ जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय सभा संपन्न झाली.या सभेसाठी अहमदनगर शहर व ग्रामीण तालुक्यातून मुख्य प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस जिल्हा संघटना पुनर्बांधणी तसेच आगामी सातारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी ची तयारी याचा आढावा घेण्यात आला.आगामी काळात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मिनी ओलंपिक स्पर्धा व राज्य राष्ट्रीय संघटनेच्या स्पर्धां बाबत चर्चा करण्यात आली. तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन ऑफ अहमदनगर चे जिल्हा सचिव तसेच ज्येष्ठ तायक्वांदो मार्गदर्शक श्री. घनश्याम सानप सर यांनी खेळात झालेल्या नवीन बदलांविषयी माहिती दिली. संघटनेत खजिनदार पदासाठी सर्वानुमते एन.आय.एस. कोच श्री. नारायण कराळे सर यांची निवड करण्यात आली. .यावेळी तायक्वांदो प्रशिक्षक गणेश वंजारी, अल्ताफ सर, सचिन कोतकर, राहुरीचे डॉ. नारायण माळी,श्रीरामपूर तालुक्याचे कलीम बिनसाद सर, राहता तालुक्याचे अशोक शिंदे सर,  नगर तालुक्याचे मच्छिंद्र साळुंखे , जाधव तुषार, तृप्ती चेमटे, मंदा खंदारे, धर्मनाथ घोरपडे, दीपक धनवटे, राष्ट्रीय खेळाडू योगेश बिचितकर , अजय पटेकर ,आदी हजर होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-संत निवृत्तीनाथ महाराजाच्या पालखीचे  श्रीरामपुर तालुक्यात आगमन होत असुन बेलापुर येथे मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होवू नये या करीता प्रथमच श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस श्रीरामपुर नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी बेलापूरात येवुन प्रत्यक्ष पहाणी केली व समाधान व्यक्त केले               सर्व अधिकारी अचानक बेलापूरात दाखल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात जावुन माहीती घेतली  दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पाच हजार वारकऱ्यांच्या भोजनाची निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी सांगितले त्यांनंतर सर्व अधिकारी विठ्ठल मंदिरात गेले तेथे निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा मान बेलापूरकरांना असल्याचे ग्रामस्थांनी अभिमानाने सांगितले तसेच मा जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गावात सर्वत्र फवारणी करण्यात आली असुन पिण्याचे पाणी भोजन अंघोळ व राहण्याची करण्यात आलेली व्यवस्था पाहुन अधिकाऱ्यांनी समाधन व्यक्त केले या वेळी सर्व सोयी सुविधा बरोबरच आरोग्य तसेच शौचालयाची काय व्यवस्था आहे याचीही अधिकाऱ्यांनी माहीती घेतली जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीसा प्रमुख मनोज पाटील यांनी सोलापुर येथे पदाभार स्विकारलेला असल्यामुळे त्यांनी पालखीतील वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होवु नये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी बेलापूरात येवुन पहाणी केली या वेळी  साहेबराव वाबळे राजेंद्र लखोटीया नंदु लढ्ढा जितेंद्र संचेती माऊली आंबेकर अनिल पुंड शोभासेठ लखोटीया रत्नेश कटारीया किरण गंगवाल दत्तात्रय जाधव सुनिल कोळसे डाँक्टर अविनाश गायकवाड विशाल आंबेकर विजू सोनवाणे निलेश नाईक अमोल गाढे सोपान महाराज हिरवे मा जि प सदस्य  शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई प्रफुल्ल डावरे ऋतुराज वाघ हितेश बोरुडे मुकुंद चिंतामणी प्रमोद पोपळघट कामगार तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे मयुर भगत मिलींद दुधाळ अरुण अमोलीक उपेंद्य कुलकर्णी हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे निखील तमनर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे आकाश शिवदे गोलु राकेचा मंगेश भगत गणेश कोळपकर उपस्थित होते विठ्ठल मंदिरात सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget