अहमदनगर प्रतिनिधी - जानेवारी २०२० पासून तपासात बेवारस दुचाकी पोलीसांना मिळून आल्या. त्या १३ दुचाकी मूळ मालकांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या हस्ते देण्यात आल्या.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना तपासा दरम्यान मिळून आलेल्या बेवारस वाहनांचे मुळमालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करुन स्थानिक गुन्हे शाखे कडील ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांचा शोध घेऊन व दुचाकी चोरीबाबत दाखल गुन्ह्यांची माहिती संकलीत करण्याबाबत तपास पथकास सूचना दिल्या होत्या.सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, विश्वास बेरड, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सचिन आडबल आदिंच्या पथकाने बेवारस दुचाकी मूळ मालकांचा शोध घेत असतांना पोनि श्री. कटके यांना बेवारस वाहनांची माहिती संकलीत केली. मुळ मालकापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करणारे विजय डिटेक्टीव्ह, (जि. कोल्हापुर) यांची माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी त्यांच्याशी संपर्क करुन तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे असलेल्या ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत घेतली.तपास पथकाने विशेष मेहनत घेऊन बेवारस दुचाकीचे अस्पष्ट झालेले चेसीज व इंजिन नंबर घेऊन कंपनीचे मुख्य कार्यालयाशी संपर्क करुन मूळ मालकांची नावे व पत्ते प्राप्त करुन त्यांच्याशी संपर्क केला. बेवारस दुचाकी मालक तेच आहेत, अशी खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे सादर करुन दुचाकी घेऊन जाण्याबाबत कळविले. दि. २१ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील ३८ बेवारस दुचाकी मालकां पैकी १३ मुळ मालकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे त्यांच्याकडील मुळ कागदपत्र हजर केले. विशेष पथकाने कागदपत्रांची शहनिशा व खात्री करुन एक दुचाकी आडगांव पोलीस ठाणे ( जि. नाशिक) येथील तपास अंमलदाराचे ताब्यात देऊन इतर १२ मुळ मालकांना स्थानिक गुन्हे शाखा पो.नि अनिल कटके यांच्या हस्ते बेवारस दुचाकी मुळमालकांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत.

Post a Comment