अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत तायक्वांदो संघटना तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने १९ जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय सभा संपन्न झाली.या सभेसाठी अहमदनगर शहर व ग्रामीण तालुक्यातून मुख्य प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस जिल्हा संघटना पुनर्बांधणी तसेच आगामी सातारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी ची तयारी याचा आढावा घेण्यात आला.आगामी काळात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मिनी ओलंपिक स्पर्धा व राज्य राष्ट्रीय संघटनेच्या स्पर्धां बाबत चर्चा करण्यात आली. तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन ऑफ अहमदनगर चे जिल्हा सचिव तसेच ज्येष्ठ तायक्वांदो मार्गदर्शक श्री. घनश्याम सानप सर यांनी खेळात झालेल्या नवीन बदलांविषयी माहिती दिली. संघटनेत खजिनदार पदासाठी सर्वानुमते एन.आय.एस. कोच श्री. नारायण कराळे सर यांची निवड करण्यात आली. .यावेळी तायक्वांदो प्रशिक्षक गणेश वंजारी, अल्ताफ सर, सचिन कोतकर, राहुरीचे डॉ. नारायण माळी,श्रीरामपूर तालुक्याचे कलीम बिनसाद सर, राहता तालुक्याचे अशोक शिंदे सर, नगर तालुक्याचे मच्छिंद्र साळुंखे , जाधव तुषार, तृप्ती चेमटे, मंदा खंदारे, धर्मनाथ घोरपडे, दीपक धनवटे, राष्ट्रीय खेळाडू योगेश बिचितकर , अजय पटेकर ,आदी हजर होते.

Post a Comment