राज्य उत्पादन शुल्क पथकाची नेवासा तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई.
श्रीरामपूर : दिनांक २४ जून २०२२ रोजी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने, नेवासा तालुक्यातील मुळा साखर कारखाना, सोनई,खडका,घोडेगाव व चांदा परिसरात, सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर छापे टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पत्रक क्रमांक २ चे निरीक्षक, गोपाळ चांदेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी
उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बी. बी. घोरतळ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ज्यात मुळा कारखाना, सोनई परिसर, खडका शिवार, घोडेगाव शिवार चांदा शिवार येथे छापेमारी करून. अवैध हातभट्टी अड्डे उधास्त करून. ५५० लिटर हातभट्टी दारू तैयार करण्याचे तयार रसायन, नष्ट करण्यात आले असून. खडका शिवारात अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह, देशी विदेशी दारूचा ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून. बाप्पु कोंडीराम गि-र्हे व विजय वसंत चावरे यांच्या विरुद्ध , मुंबई दारूबंदी कायदा १९४९ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक गोपाळ चांदेकर, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. आभाळे, दुय्यम निरीक्षक जी. एन. जायकोडी ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक, के. के. शेख, राज्य उत्पादन शुल्क विभागचे जवान प्रविण साळवे व महिला जवान सौ. स्वाती फटांगरे आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.
Post a Comment