अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देताच अहमदनगर शहराचे पोलीस उपअधीक्षक यांचे पथक, एलसीबी आणि तोफखाना पोलिसांनी शुक्रवार, शनिवार हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई केली.उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने माळीवाडा वेस ते इम्पिरिअल चौकाकडे जाणार्या रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. रोख रकमेसह 32 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार चालविणारे रोहित रवींद्र कदम आणि आकाश प्रकाश कदम (दोघे रा. माळीवाडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.बागडपट्टी येथे तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. 18 हजार 360 रुपयांची रोकड हस्तगत केली. दिलीप एकनाथ जाधव, गणेश प्रल्हाद चोभे, संजीव रामचंद्र राऊत, अमित अनिल कुमार, बिलाल मन्सुर शेख आणि मंगेश बाळासाहेब फुलसौंदर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीच्या पथकाने 16 तोटी कारंजा येथे अड्ड्यांवर कारवाई केली. आकाश बाबासाहेब ठोंबरे (वय 30 रा. वारूळाचा मारूती) आणि रितेश दिलीप लसगरे (वय 30 रा. मोची गल्ली) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नेप्ती नाका परिसरातील गणपती कारखान्याच्या मागे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करत चार हजार रुपयांची दारू नष्ट केली. याप्रकरणी कैलास संजय निकम (वय 28 रा. नेप्ती नाका) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक चाळ, रेल्वेस्टेशन येथील हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर एलसीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत साडेतीन हजारांची दारू नष्ट करण्यात आली. राजू खंडू आठवले (वय 45, रा. सारसनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामवाडी, बोल्हेगावातील संभाजीनगर आणि कोंड्यामामा चौकात सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या तीन अड्ड्यांमधील चार हजारांची दारू नष्ट करण्यात आली. हाशिर शहीद शेख (वय 65 रा. रामवाडी झोपडपट्टी), संजय नामदेव कांबळे (वय 44 रा. बोल्हेगाव) आणि करण अर्जुन साळुंके (वय 24 रा. मंगलगेट) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment