Latest Post


बेलापुर (प्रतिनिधी  )-रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीने आयोजित केलेल्या कर्मयोगी मुरलीधर खटोड चषकाचा बहुमान व रुपये २१ हजार रुपयाचे पारितोषिक   कोपरगावच्या येसगाव संघाने मिळवीले            रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीच्या वतीने बेलापूरात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता प्रथम क्रमांकाचे (रुपये२१००० )एकवीस हजार रुपयाचे पारितोषिक कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने ठेवण्यात आले होते. तर योगेश पाटील नाईक मित्रमंडळाच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे (रुपये ११०००)अकरा हजार रुपयाचे तसेच तृतीय क्रमांकाचे (रुपये ७०००)सात हजार रुपयाचे पारितोषिक किरण औटी मित्र मंडळाच्या वतीने ठेवण्यात आले होते. उत्तेजनार्थ (रुपये ५००० )पाच हजार रुपयाचे पारितोषिक किरण गंगवाल व आनंद दायमा यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण सोळा संघांनी सहभाग नोंदवीला. बेलापूरचा डीटीडीसी व कोपरगावचा येसगाव संघ यांच्यात अतिम लढत झाली. येसगाव संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात ६४ धावा केल्या. परंतु डीटीडीसी संघाला ही धावसंख्या गाठता आली नाही. प्रथम क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक येसगाव संघाने मिळवीले तर बेलापूरच्या डीटीडीसी संघाने दुसऱ्या क्रमांकाचे रुपये अकरा हजार रुपयाचे पारितोषिक मिळवीले. पढेगाव संघाने तिसरा तर एसडी लाईव्ह बेलापुर या संघाला चौथे बक्षिस देण्यात आले. या वेळी अशा मैदानी खेळांच्या स्पर्धा वेळोवेळी भरविल्या जाव्यात जेणे करुन मोबाईल तसेच व्यसनाच्या अहारी गेलेली तरुण पिढी खेळाकडे तसेच व्यायामाकडे वळेल असे मत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केले. या वेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,माजी सरपंच भरत साळूंके ,अजय डाकले, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, अभिजित राका ,योगेश नाईक ,प्रसाद खरात, मुन्ना खरात ,गणेश मगर,जयेश अमोलीक , रफीक शेख , किरण भांड ,भूषण चंगेडीया, अँड.  यशवंत नाईक आदिच्या उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न झाले या सर्व सामन्याचे फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते त्या करीता निखिल ढमाले व विनोद शिंदे यांनी विशेष परिश्रम  घेतले. स्पर्धा यशस्वी करणेसाठी  रामभाऊ मगर ,सुनिल ढमाळे, फिरोज पठाण, किरण साळूंके, संकेत कुमावत, साई पवार, शकील शेख, सनी जगताप,  प्रतिक कर्पे, जितेश साळूंके, ब्रिजेश कर्पे, अजय धनवटे आदिंनी विशेष प्रयत्न केले शाहरुख पठाण यांनी सर्व सामन्याचे सुंदर असे  समालोचन केले होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे संयुक्त सरकार असुन समाजवादी पक्षाचे देखील महाविकास आघाडीस खुले समर्थन आहे,याकरीता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आमदार आबु आझमी यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्ष प्रदेशाध्यक्षांसह पक्ष प्रमुखांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणी आ.भा.राष्ट्रीय कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे संयुक्त सरकार असल्याने सर्वत्र खुपच चांगले आणि प्रशंसनीय विकासकामे होत आहे,तथा या आघाडीस पाठिंबा म्हणून समाजवादी पक्षाने देखील खुले सर्मथन दिलेले आहे,सोबतच समाजवादी पार्टी नेहमी आपल्या बरोबरीने कामे करण्यात सदैव तत्पर आणि अग्रेसर असतेच याकरीता आमच्या समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार आबु असिम आजमी यांना आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात समावून घेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी आम्हा सर्व समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रति

ना.उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) शिवसेना पक्ष प्रमुख मुंबई,ना.जयंत पाटील,मंत्री.जलसंपदा व लाभक्षेत्र प्राधिकरण, प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मुंबई,आ.नानासाहेब पटोले,

प्रदेशाध्यक्ष : अ.भा.राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, मुंबई,मा.खा.शरद पवार,

पक्ष प्रमुख: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तथा सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रसार माध्यमांना पाठविण्यात आल्या असल्याचेही जोएफ जमादार म्हणाले.


श्रीरामपूर प्रतिनिधी- उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या, कोपरगाव हद्दीतील रेल्वे मालधक्क्यावर जेव्हा जेव्हा रॅक येतो, त्यावेळी काही हुंडेकरी जाणीवपूर्वक, स्थानिक कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांना डावलून. साईराजा रोडवेज व  साईचैतन्य रोड लाईन्सच्या .७० ते ८० गाडया क्षमतेपेक्षा जास्त माल घेवून वाहतुक करीत आहे. या ओव्हरलोड वाहतुक करून, स्थानिक युनियनवर अन्याय करीत असल्याने. अशा प्रकारच्या ओव्हरलोड वाहतूकीवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधितांवर व  त्यांचे गाडयांवर कडक कारवाई करून. शासकीय नियमानुसार दंडासह, जप्तीची कारवाई करावी. अशी मागणी कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई न झाल्यास ,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे डी डगळे यांना, निवेदनाद्वारे युनियनने दिला आहे. सदरचे निवेदन देण्या वेळी, कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्ची,अनिल हरकल,किरण वैद्य,वसीम सय्यद,प्रशांत पानकडे,संदीप कु-र्हे आदींसह कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


श्रीरामपूर(प्रतिनिधी) :अहमदनगर पोखर्डी येथे छत्रपती स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेमध्ये संस्कार स्पोर्ट्स क्लब,श्रीरामपूरच्या खेळाडूंनी यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज बारहाते (सुवर्ण),अनन्या शिंदे (रोप्य),अर्णव पगारे  (कास्य),सम्राट फंड(कास्य),प्रेमकुमार आठरे (कास्य) यांनी पदक प्राप्त केले . सर्व सहभागी व विजयी खेळाडूंनी   अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून श्रीरामपूर शहराचे व परिसराचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ३०० ते ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा आयोजकांनी विशेष करून संस्कार स्पोर्ट्स क्लबचे अभिनंदन केले.यशस्वी खेळाडूंचे ह.भ. प.आचार्य शुभम महाराज कांडेकर,श्री करणदादा ससाणे, दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक श्री करण नवले,ॲड.गावडे ,श्री विजय खरात, श्री सचिन बडदे,श्री गणेश शिंदे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. योग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाच्या जोरावर खेळाडू आपले करिअर घडू शकतो,असे मोलाचे मार्गदर्शन महाराजांनी खेळाडूंना केले.शिवकालीन खेळ व शिवकालीन बालसंस्कार खऱ्या अर्थाने संस्कार स्पोर्ट्स क्लब मध्ये दिले जाते,असे प्रतिपादन श्री करणदादा ससाणे यांनी केले. संस्कार स्पोर्ट्स क्लब गेल्या ७ वर्षापासून शिवकालीन खेळ संस्कृती व बाल संस्कार याची खऱ्या अर्थाने जोपासना करीत आहे.श्रीरामपूरातील व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी,विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रशिक्षक श्री प्रवीण कुदळे यांनी केले.सर्व यशस्वी खेळाडूंना गणेश कुदळे व मुख्य प्रशिक्षक शिवभक्त श्री प्रवीण कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर प्रतिनिधी - पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करुन खंडणीची मागणी करणा-यापैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी वेशांतर करून किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याला राहुरीत पकडले आणि सुधीर मोकळ याला गणेशनगर (ता. संगमनेर) येथून तर संदीप कोरडे यास घोगरगांव (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले. तिघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या कार ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली. सर्व आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले आहे  दि. २७ एप्रिल २०२२ रोजी किरण दुशिंग व इतर अज्ञात तीनजणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पांढरे रंगाचे कारमध्ये बसविले. दोन्ही हात उपरण्याने बांधून जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण करुन खिशातील ११ हजार ५०० रु. रोख, विवो कंपनीचा मोबाईल व ताब्यातील पल्सर दुचाकी असा एकूण ४८ हजार ५०० रु.किंचा मुद्देमाल काढून घेतला. मारहाण करुन ३ लाख ५० हजार  रु.ची खंडणीची मागणी केली. लोहारे गांवातील मंदीरासमोर लोकांची गर्दी पाहून जीव वाचवण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून मोठमोठ्याने आरडाओरडा केली. तेथे जमलेल्या लोकांनी कार आडवताच आरोपी गाडी सोडून पळून गेले व सुटका झाली, या भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय ४८, रा. मुसळेवस्ती, लोणी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६५ / २०२२ भादविक ३६४ (अ), ३९७,३८४, ३४ सह आर्म ॲक्ट३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली, गुन्ह्यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा राहुरी एसटीस्टॅण्डजवळ येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती पोनि श्री कटके यांनी पथकास देऊन रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी राहुरी येथे जाऊन वेशांतर करुन सापळा लावला.आरोपी किरण दुशिंग हा एक पांढरे रंगाचे कारमधून खाली उतरताना दिसला, त्याक्षणी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पथकाने त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय २७, रा. उंबरे, ता. राहुरी) असे असल्याचे सांगितले. त्याला पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याचा साथीदार सुधीर मोकळ (रा. पारेगांव, ता. कोपरगांव) व संदीप कोरडे (रा. घोगरगांव, ता. श्रीगोंदा) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे आरोपी सुधीर मोकळ याच्या राहत्या पारेगांव खा (ता. राहाता) येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा गणेशनगर, (ता. संगमनेर) येथे आहे, अशी माहिती समजल्याने स्थागुशा पथक तात्काळ गणेशनगर (ता. संगमनेर) येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुधीर संपत मोकळ, (वय २३, रा. पारेगांव खा, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. तसेच आरोपी संदीप कोरडे याच्या राहत्या घरी घोगरगांव, (ता. श्रीगोंदा) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो त्याचे राहत्या घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.तसेच आरोपी किरण दुशिंग याच्याकडे स्विफ्टगाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीस समाधानकारक माहिती दिली नाही. त्याचेकडे सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने गाडी ही मध्यप्रदेश राज्यातून चोरी केल्याबाबत सांगितले. ती १० लाख रु. किचे स्विफ्टकारसह ताब्यात घेऊ तीनही आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोलीस करीत आहे.यापूवी आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात खून करणे, अपहरणासह खून करणे, अपहरण करणे, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ९९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटक यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील पोसई  सोपान गोरे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी-मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा वर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी या साठी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी मुस्लिम धर्मगुरुन सह मुस्लिम समाजाचे जबाबदार मंडळीन सह समाजाचे नागरिक आपली सर्व कामकाज पूर्ण पणे बंद करून सहभागी होते मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा  विरोधात देशभर तीव्र निदर्शने केली जात आहे. याचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यातही आज उमटले.मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त

वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद जगभरात उमटले. जगभरातील मुस्लिम देशांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून भारत सरकारकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे भारताची नाचक्की झाली.दरम्यान मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी भारत बंदचे अवाहन केले होते. या बंदला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारच्या नमाजनंतर देशभरातील मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले. भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. श्रीरामपूर मध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभरात कुठेही अनुचित घटना घडली नाही. शांततेत दिवसभर बंद सुरू होता.व्यापारी बांधवांनी आजच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारच्या नमाज नंतर श्रीरामपूर शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली.

अहमदनगर प्रतिनिधी-भिंगार कॅम्प पोलिसांच्या आशीर्वादाने येथील बाजारतळावर खुलेआम सुरू असणार्‍या बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी तिघांना पकडण्यात आले.भिंगार शहरातील चेतना वाईन शॉपच्या पाठीमागे बाजारतळावर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस नाईक संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजय रामपाल बोत (वय 40), भुषण नंदकुमार खळे (वय 23), बंदी राजु मोरे (वय 21, तिघे रा. भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एलसीडी, सीपीयु, किबोर्ड, रोख रक्कम असा 18 हजार 550 रूपयांचा ऐजव जप्त केला आहे. ऐतिहासिक भिंगार शहरात सध्या अवैध धंद्ये खुलेआम सुरू आहे. येथील बाजारतळावर या धंद्यानां उत आला आहे. गुटखा, मावा, दारू विक्रीपासून मटका, जुगार, बिंगो या अवैध धंद्याकडे भिंगार कॅम्प पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष झाले आहे.दरम्यान भिंगार शहरात बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार फकीर शेख, लक्ष्मण खोकले, संदीप जाधव यांच्या पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता बोत, खळे व मोरे बिंगो नावाचा हार जितीचा जुगार लोकांना खेळताना व खेळविताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ऐकिकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती मिळते, त्यांच्याकडून कारवाई होत असतानाही भिंगार कॅम्प पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे कारवाई करून शकत नसल्याने त्यांच्याविषयी पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget