अहमदनगर प्रतिनिधी-भिंगार कॅम्प पोलिसांच्या आशीर्वादाने येथील बाजारतळावर खुलेआम सुरू असणार्या बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी तिघांना पकडण्यात आले.भिंगार शहरातील चेतना वाईन शॉपच्या पाठीमागे बाजारतळावर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस नाईक संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजय रामपाल बोत (वय 40), भुषण नंदकुमार खळे (वय 23), बंदी राजु मोरे (वय 21, तिघे रा. भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एलसीडी, सीपीयु, किबोर्ड, रोख रक्कम असा 18 हजार 550 रूपयांचा ऐजव जप्त केला आहे. ऐतिहासिक भिंगार शहरात सध्या अवैध धंद्ये खुलेआम सुरू आहे. येथील बाजारतळावर या धंद्यानां उत आला आहे. गुटखा, मावा, दारू विक्रीपासून मटका, जुगार, बिंगो या अवैध धंद्याकडे भिंगार कॅम्प पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष झाले आहे.दरम्यान भिंगार शहरात बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार फकीर शेख, लक्ष्मण खोकले, संदीप जाधव यांच्या पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता बोत, खळे व मोरे बिंगो नावाचा हार जितीचा जुगार लोकांना खेळताना व खेळविताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ऐकिकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती मिळते, त्यांच्याकडून कारवाई होत असतानाही भिंगार कॅम्प पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे कारवाई करून शकत नसल्याने त्यांच्याविषयी पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment