श्रीरामपूर प्रतिनिधी-मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा वर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी या साठी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी मुस्लिम धर्मगुरुन सह मुस्लिम समाजाचे जबाबदार मंडळीन सह समाजाचे नागरिक आपली सर्व कामकाज पूर्ण पणे बंद करून सहभागी होते मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा विरोधात देशभर तीव्र निदर्शने केली जात आहे. याचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यातही आज उमटले.मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त
वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद जगभरात उमटले. जगभरातील मुस्लिम देशांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून भारत सरकारकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे भारताची नाचक्की झाली.दरम्यान मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी भारत बंदचे अवाहन केले होते. या बंदला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारच्या नमाजनंतर देशभरातील मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले. भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. श्रीरामपूर मध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभरात कुठेही अनुचित घटना घडली नाही. शांततेत दिवसभर बंद सुरू होता.व्यापारी बांधवांनी आजच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारच्या नमाज नंतर श्रीरामपूर शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली.

Post a Comment