पिस्तूल दाखवून अपहरण करीत खंडणी मागणारे आरोपी अटक ; नगर एलसीबीची कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी - पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करुन खंडणीची मागणी करणा-यापैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी वेशांतर करून किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याला राहुरीत पकडले आणि सुधीर मोकळ याला गणेशनगर (ता. संगमनेर) येथून तर संदीप कोरडे यास घोगरगांव (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले. तिघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या कार ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली. सर्व आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले आहे  दि. २७ एप्रिल २०२२ रोजी किरण दुशिंग व इतर अज्ञात तीनजणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पांढरे रंगाचे कारमध्ये बसविले. दोन्ही हात उपरण्याने बांधून जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण करुन खिशातील ११ हजार ५०० रु. रोख, विवो कंपनीचा मोबाईल व ताब्यातील पल्सर दुचाकी असा एकूण ४८ हजार ५०० रु.किंचा मुद्देमाल काढून घेतला. मारहाण करुन ३ लाख ५० हजार  रु.ची खंडणीची मागणी केली. लोहारे गांवातील मंदीरासमोर लोकांची गर्दी पाहून जीव वाचवण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून मोठमोठ्याने आरडाओरडा केली. तेथे जमलेल्या लोकांनी कार आडवताच आरोपी गाडी सोडून पळून गेले व सुटका झाली, या भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय ४८, रा. मुसळेवस्ती, लोणी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६५ / २०२२ भादविक ३६४ (अ), ३९७,३८४, ३४ सह आर्म ॲक्ट३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली, गुन्ह्यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा राहुरी एसटीस्टॅण्डजवळ येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती पोनि श्री कटके यांनी पथकास देऊन रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी राहुरी येथे जाऊन वेशांतर करुन सापळा लावला.आरोपी किरण दुशिंग हा एक पांढरे रंगाचे कारमधून खाली उतरताना दिसला, त्याक्षणी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पथकाने त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय २७, रा. उंबरे, ता. राहुरी) असे असल्याचे सांगितले. त्याला पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याचा साथीदार सुधीर मोकळ (रा. पारेगांव, ता. कोपरगांव) व संदीप कोरडे (रा. घोगरगांव, ता. श्रीगोंदा) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे आरोपी सुधीर मोकळ याच्या राहत्या पारेगांव खा (ता. राहाता) येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा गणेशनगर, (ता. संगमनेर) येथे आहे, अशी माहिती समजल्याने स्थागुशा पथक तात्काळ गणेशनगर (ता. संगमनेर) येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुधीर संपत मोकळ, (वय २३, रा. पारेगांव खा, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. तसेच आरोपी संदीप कोरडे याच्या राहत्या घरी घोगरगांव, (ता. श्रीगोंदा) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो त्याचे राहत्या घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.तसेच आरोपी किरण दुशिंग याच्याकडे स्विफ्टगाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीस समाधानकारक माहिती दिली नाही. त्याचेकडे सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने गाडी ही मध्यप्रदेश राज्यातून चोरी केल्याबाबत सांगितले. ती १० लाख रु. किचे स्विफ्टकारसह ताब्यात घेऊ तीनही आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोलीस करीत आहे.यापूवी आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात खून करणे, अपहरणासह खून करणे, अपहरण करणे, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ९९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटक यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील पोसई  सोपान गोरे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget